• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

निशुल्क राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळाव्यात चर्मकार समाज एकवटला

ByMirror

Oct 20, 2022

वधुवर मेळाव्यास राज्यातील समाजबांधवांची हजेरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या निशुल्क राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळाव्यास राज्यातील चर्मकार समाज बांधवांचा सहभाग लाभला. श्रीरामपूर येथे झालेल्या या वधुवर मेळाव्यात दोनशेपेक्षा जास्त वधु-वरांची नोंदणी झाली. यावेळी समाज बांधवांसह महिला व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या वधुवर मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार भानुदास मुरकुटे, करण ससाणे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नितिन उदमले, जेष्ठ नेते तुकारामजी शेंडे, नगरसेविका चंद्रकला डोळस, रामदास सोनवणे, कवी सुभाष सोनवणे, अदिनाथ बाचकर, भाऊसाहेब डोळस, भारत तुपे, संजय तुपे, उद्योजक बाबासाहेब आंबेडकर, रविश्री गाडे महाराज, युवा उद्योजक अमोल बोराडे, कारभारी देव्हारे, अभिजीत पोटे आदी उपस्थितीत होते.


माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी वधुवर पालक परिचय मेळावे काळाची गरज बनली आहे. धावपळीच्या जीवनात समाज विखुरला जात असून, विवाह जुळविताना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी हा उपक्रम दिशादर्शक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्य संजय खामकर म्हणाले की, चर्मकार विकास संघाच्या माध्यमातून निशुल्क राज्यस्तरीय वधुवर मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्रातील अनेक शहरात केले जात आहे. विवाह जुळविण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून केले जात आहे. या उपक्रमातून समाज एकजुट करण्याचे व तळागळातील बांधवांच्या विकासासाठी संघटना कार्य करीत असतांना युवक, महिला, गटई कामगार, हातावर पोट असणार्‍यांना आधार देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


संजय खामकर यांच्या मार्गदर्शखाली या वधुवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी श्रीरामपुर तालुका अध्यक्ष चांगदेव देवराय, सुरेश भोसले, रविंद्र गाडेकर, दादासाहेब काबंळे, संतोष देवराय, कर्णासाहेब कापसे, सर्जेराव देवरे, सतिश खामकर, गणेश काबंळे, सुवर्णा कांबळे, अमोल एडके, राकेश बोरुडे, भाऊसाहेब साळवे यांनी योगदान दिले. यावेळी अहमदनगर जिल्हा वधुवर समितीचे अध्यक्ष श्रीपती ढोसर, अरुण गाडेकर, विलास जतकर, नानासाहेब शिंदे, देवराम तुपे, मनिष कांबळे, अमोल डोळस, संदीप डोळस, संतोष लोहकरे, उपाध्यक्ष विठ्ठल देवरे, तालुका अध्यक्षा सुरेखाताई देवरे, कैलास वाघमारे, भिमराव तेलोरे, बाळासाहेब गोळेकर, बाळासाहेब कांबळे, सुभाष घोडके, प्रमोद वर्पे, राजाभाऊ साळवे आदी पदधिकारी उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *