• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

गुरुनानक देवजी ग्रुपने केली वंचितांची दिवाळी गोड

ByMirror

Oct 20, 2022

कुष्ठधाम व मुकबधीर विद्यालयात मिठाई व फराळचे वाटप

दिवाळी आनंद वाटण्याचा सण -जनक आहुजा

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील गुरुनानक देवजी ग्रुपच्या (जीएनडी) वतीने वंचितांची दिवाळी गोड करण्यात आली. कुष्ठधाम येथील ज्येष्ठ नागरिक व मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिठाई व फराळचे वाटप करण्यात आले. यावेळी जनक आहुजा, महेश मध्यान, संजय आहुजा, सतीश गंभीर, अवतार गुरली, मुकबधीर विद्यालयाचे गोंधळे सर आदी उपस्थित होते.


गुरुनानक देवजी ग्रुपच्या सदस्यांनी वंचितांची दिवाळी साजरी होण्यासाठी सावेडी येथील कुष्ठधाम व वडगाव गुप्ता रोड येथील मुकबधीर विद्यालयास भेट देऊन सामाजिक भावनेने हा उपक्रम राबविला.


जनक आहुजा म्हणाले की, दिवाळी हा आनंद साजरा करण्यापेक्षा आनंद वाटण्याचा सण आहे. दुर्बल, वंचित हे आपल्याच समाजातील घटक असून, त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. वंचितांची दिवाळी गोड करणे मोठे पुण्याचे काम असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिक व मुकबधिर विद्यालयातील मुलांच्या चेहर्‍यावर मिठाई व फराळ मिळाल्याचा आनंद व समाधान दिसत होता.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *