• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

भिंगार छावणी परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची दिवाळी भेट

ByMirror

Oct 18, 2022

बेस्ट फ्रेंड फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम

दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आल्यास समाजाचा विकास साधला जाणार -जनक आहुजा

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील बेस्ट फ्रेंड फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची दिवाळी भेट देण्यात आली. एक हात मदतीचा उपक्रमातंर्गत छावणी परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा, महात्मा गांधी उर्दू शाळा, नूतन माध्यमिक शाळा व सरदार वल्लभाई पटेल शाळेतील 772 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.


जनक आहुजा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अर्जुनराव बेरड, जयराम मेहतानी, बेस्ट फ्रेंड फाउंडेशनचे अध्यक्ष लोकेश मेहतानी, उपाध्यक्ष विजय भुतकर, संदीप टेके, अमोल हजारे, खेमचंद मेहतानी, प्रवीण आडबल्ले, वैभव पानमळकर, विकास वाल्मिकी, सुरज सराटे, संदीप हराळे, मुख्याध्यापक संजय शिंदे, मुख्याध्यापक भोसले, मुख्याध्यापक श्रीमती मुबिना आदींसह शालेय शिक्षक उपस्थित होते.


जनक आहुजा म्हणाले की, लहान विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असून, गरजू घटकातील विद्यार्थ्यांना आधार देण्याची गरज आहे. दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आल्यास समाजाचा विकास साधला जाणार आहे. मुले उच्च शिक्षित झाल्यास समाजाची प्रगती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


लोकेश मेहतानी यांनी पुढील पिढीच्या भवितव्यासाठी बेस्ट फ्रेंड फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत केली जात आहे. गरजू घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी सर्वांनी हातभार लावण्याची गरज असून, या भावनेने हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *