• Tue. Jun 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या नगर तालुकाध्यक्षपदी विजय भालसिंग

ByMirror

Aug 25, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या नगर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे.


जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर, जिल्हाध्यक्ष तथा माजी तहसीलदार वाल्मीक महाराज जाधव, नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. जनार्दन पगार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकित भालसिंग यांची नियुक्ती करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.


वाळकी (ता. नगर) येथील विजय भालसिंग यांचे सामाजिक क्षेत्रात कार्य सुरु आहे. भालसिंग एस.टी. बँकेत कार्यरत असून, विविध उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहे. निस्वार्थ भावनेने सुरु असलेल्या त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची नगर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


विजय भालसिंग यांनी विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गरजू घटकांना आधार देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर माऊली सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष रोहिदास महाराज जाधव, महिला जिल्हाध्यक्षा ह.भ.प. हिराताई मोकाटे, शहराध्यक्ष जगन्नाथराव गनिंबाळकर, नेवासा तालुकाध्यक्ष मंगेश महाराज वाघ, शेवगाव तालुकाध्यक्ष ह.भ.प. डॉ. जालिंदर महाराज निकम, महिला नगर तालुकाध्यक्षा प्रतिभा सांबळे यांच्यासह महाराष्ट्र कमिटीच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *