• Fri. Sep 4th, 2026

Mirrornews24

Marathi News

एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीची 52 वी राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा उत्साहात

ByMirror

Sep 4, 2026
एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीची 52 वी राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा उत्साहात

ज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास सोडू नका; अबॅकससारख्या नव्या संकल्पनांचा स्वीकार करा” -आमदार विक्रमसिंह पाचपुते

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वेगवान गणिती गणना, विलक्षण एकाग्रता, स्मरणशक्ती आणि आत्मविश्‍वासाचा अद्भुत संगम अनुभवायला मिळालेल्या एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या 52 व्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.विविध शहरांमधून आलेल्या तब्बल 1,400 विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे या राष्ट्रीय स्पर्धेला ज्ञानोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.


या प्रसंगी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भविष्यातील जग हे ज्ञान, तंत्रज्ञान आणि नवसंकल्पनांवर आधारित असणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन आणि अबॅकस मण्यांच्या पाटीचे पूजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक सविता काळे, पंचायत समिती सदस्य अमित जाधव, ,नगरसेवक अमित जाधव, प्राचार्या नीता खामकर, उपमुख्याध्यापिका जयश्री खणसे, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ शहराध्यक्ष निलेश काळे, बालभारती सदस्य स्वप्निल तांबे, भाजपा अध्यक्ष नितीन नलगे, संस्थापक अशोक कारले, अशोक घडेकर, अबॅकस नवसंशोधनातील जगातील पहिली पीएचडी प्राप्त डॉ. कल्पना घडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
1,400 विद्यार्थ्यांतून कु. वेदीका शेजाळ हिने आपल्या उत्कृष्ट कामगिरीची छाप उमटवत ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ हा मानाचा किताब पटकावला. तिच्या उल्लेखनीय यशाबद्दल तिला स्मृतिचिन्ह व सुमारे ₹3,000 चे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.


अहिल्यानगर, पारनेर, कर्जत, सोलापूर, श्रीगोंदा, काष्टी आदी विविध शहरांमधून आलेल्या सुमारे 1,400 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावले. या स्पर्धेतून 20 विद्यार्थ्यांनी ‘चॅम्पियन’ होण्याचा बहुमान पटकावला. यामध्ये लहान गट -ईश्‍वरी बोरुडे, प्रणाली चव्हाण, दिव्या मोरे, राजवर्धन शेडगे, शौर्य मिथे, श्रेयश साळुंखे, आराध्या केसवड, मित कुरुमकर, सर्वेश कोल्हे, दिव्या साळुंखे मोठ्या गटात प्रवीण कावळे, प्रथमेश गरुड, श्रावणी गायकवाड, आराध्या माने, ईश्‍वरी माने, अन्वय काळे, कल्याणी घनवट, स्वरा गवळी, अर्णव भालके, आर्य साळवे, वृषाली औटी, अपेक्षा जगतकर, विनायक कापसे, शुभेच्छा गायकवाड, श्रावणी पवार यांचा समावेश आहे.


उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक/शिक्षिका माधुरी वेताळ, शीतल खेतमाळीस, औदुंबर गुंड यांना ‘एव्हरेस्ट अबॅकस बेस्ट टीचर अवॉर्ड ’, तर प्रतिभा पुजारी, वैशाली शेजाळ यांना “एव्हरेस्ट अबॅकस स्टार टीचर अवॉर्ड”ने सन्मानित करण्यात आले. तसेच अबॅकस क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे 15 विद्यार्थ्यांना ‘एव्हरेस्ट अबॅकस मास्टर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. रेश्‍मा कळमकर यांनी अबॅकसचे प्रभावी प्रत्यक्ष डेमो सादर करून विद्यार्थ्यांच्या गणनाक्षमतेमागील शास्त्र आणि पद्धत उपस्थितांसमोर उलगडून दाखवली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रतिभा पुजारी यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *