‘ऋणानुबंध’ आणि ‘ ए.एस.पी. क्रिएशन ’चा संयुक्त उपक्रम; नामांकित कलाकारांची लाभणार साथ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय संगीतसृष्टीतील अवलिया आणि अष्टपैलू गायक किशोर कुमार यांच्या जयंतीचे औचित्य साधून अहिल्यानगर शहरात संगीताची भव्य पर्वणी आयोजित करण्यात आली आहे. ‘ऋणानुबंध’ आणि ‘ ए.एस.पी. क्रिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 2 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6:00 वाजता ‘माऊली सभागृह’ येथे ‘ लार्इव्ह म्युझिक कॉन्सर्ट (MOODS OF KISHOR) या विशेष सुश्राव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मोफत पासची व्यवस्था करण्यात आली असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक अजित रोकडे, सारिका रघुवंशी आणी प्रशांत बंडगर यांनी केले आहे.
किशोरदांच्या अफाट ऊर्जेला, भावोत्कट सुरांना आणि त्यांच्या अष्टपैलू कलाप्रवासाला उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. या सोहळ्यात पुण्यातील प्रसिद्ध गायक व ‘व्हॉईस ऑफ किशोर कुमार’ म्हणून सुपरिचित असलेले राजू काजे आणि सुप्रसिद्ध गायिका वैजू चांडवले आपल्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
या मैफिलीत अजित रोकडे, सारिका रघुवंशी, प्रशांत बंडगर, डॉ. शैलेंद्र खंडागळे, डॉ. दमन काशीद, डॉ. गायत्री काशीद, महेश घावटे, डॉ. विवेकानंद कंगे आणि नीना सावला हे गुणी गायक साथ देणार आहेत. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निवेदक प्रवीण पोतदार यांचे निवेदन असणार असून, ते गाण्यांसोबतच किशोरदांच्या आयुष्यातील विविध किस्से जिवंत करणार आहेत.
दिलावर शेख व सत्यजित सराफ यांच्या संगीत संयोजनाखाली मातब्बर वादकांच्या साथीने ऑक्टोपॅड, गिटार, ड्रमसेट आणि तबल्याच्या सुरांचा त्रिवेणी संगम यावेळी अनुभवायला मिळणार आहे. अहिल्यानगरकरांनी या संगीतमय सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून गाण्यांच्या या भव्य आनंदाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन ‘ऋणानुबंध’ आणि ‘ए.एस.पी. क्रिएशन’ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी चे मोफत पासेस स्वामी समर्थ मोबाईल शॉपी पारिजात चौक गुलमोहर रोड या ठिकाणी उपलब्ध असून पासेससाठी 9420635096, 7350881515,तसेच 8956363668 या क्रमांकावर फोन करण्याचे म्हंटले आहे.

