• Mon. Jun 8th, 2026

जागतिक सायकल दिनानिमित्त अहिल्यानगरात सायकलिंगचा जल्लोष

ByMirror

Jun 8, 2026

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधत सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने जिल्हा सायकलिंग असोसिएशन आणि इन्फिनिटी सायकलिंग अकॅडमी व बाईक टेक पॉईंट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 7 जून) राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धा उत्साहात पार पडली. यासोबतच महिलांसाठी विशेष असलेल्या ‘अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स सायकलिंग लीग’ देखील मोठ्या उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील नामांकित महिला व पुरुष सायकलपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेत सायकलिंगचा रोमांचक अनुभव दिला. जिल्ह्यातील सायकलपटूंच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण क्रीडामय झाले होते.


पेमराज सारडा महाविद्यालय मैदानापासून स्पर्धेला प्रारंभ झाला. महिलांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये संधी मिळावी आणि सायकलिंग क्षेत्रात त्यांचे प्रोत्साहन वाढावे या उद्देशाने खेलो इंडिया अंतर्गत सलग दुसऱ्या वर्षी या लीगचे आयोजन करण्यात आले होते.


सकाळी 6 वाजता सारडा महाविद्यालय मैदानावरून ‘स्लो झोन’च्या माध्यमातून स्पर्धेला सुरुवात झाली. पत्रकार चौक, डीएसपी चौक, स्टेट बँक चौक, चांदणी चौक, सोलापूर चौक मार्गे टँक म्युझियमपर्यंत सायकलपटूंनी प्रवास केला. टँक म्युझियमपासून मुख्य स्पर्धेला सुरुवात झाली. पुरुषांची स्पर्धा वाळुंज, चांदबिबी बायपास चौक मार्गे पुन्हा टँक म्युझियम येथे समाप्त झाली.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते गणेश पवार, राष्ट्रीय पदकविजेते गौरव सिंह, राष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग प्रशिक्षक संकल्प थोरात, श्रीनिवास लोंढे, प्रा. साईनाथ थोरात, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव प्रा. संजय साठे, संभाजी मोहिते (कोच- इन्फिनिटी सायकलिंग अकॅडमी) , लाला कांबळे, वैभव भोर, सागर करांडे, राष्ट्रीय पदकविजेते ओम करांडे, बाळासाहेब दीक्षित, वासुदेव पांढरे, अनिल भवर, अशोक गाडेकर, शिवनाथ मोहिते, सरपंच विष्णू थोरात, किरण बोयणे, पांडुरंग भोजने, विकास भालेराव, मोबिन शेख तसेच सिंहगड सायकलिंग फाउंडेशन (पुणे)चे नितीनजी थोपटे आदी मान्यवर उपस्थित होते.


विजेत्यांना रोख रक्कम, मेडल्स आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. महिलांसोबतच हौशी पुरुषांसाठी 40 किलोमीटर सायकल फन राईड, मेन्स 40 किलोमीटर स्पर्धा तसेच 18 वर्षांखालील मुलांसाठी 20 किलोमीटर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्यांसाठी एकूण 80 हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली.
या स्पर्धेसाठी राष्ट्रीय सायकलिंग महासंघ, खेलो इंडिया आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी अहिल्यानगर सायकलिंग असोसिएशन, सायकलिंग फेडरेशन ऑफ अहिल्यानगर तसेच राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय यश मिळविणाऱ्या सायकलपटूंचा सत्कार करण्यात आला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र पोलीस, शहर वाहतूक शाखा, जिल्हा रुग्णालय आणि पेमराज सारडा महाविद्यालय यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.


स्पर्धेचे पंच म्हणून प्रा. संजय साठे, प्रा. कल्पेश भागवत, प्रा. शैलेश गवळी, प्रा. रावसाहेब बाबर, प्रा. साईनाथ थोरात, क्रीडा अधिकारी विशाल गर्जे, प्रा. अविनाश काळे, प्रा. संजय धोपावकर आणि प्रा. दिनेशल भालेराव यांनी काम पाहिले.
स्पर्धेसाठी नरेंद्र फिरोदिया ( आय लव्ह नगर ), शौनक खराडे (KPGC), नदीम सय्यद ( हुंडेकरी लॉन्स), प्रताप (काका) ढाकणे(ममता इंटरप्राईजेस), दत्ता आढाव, सचिन राणे (व्हिजन नेक्स्ट), लॉरेन्स स्वामी(बालाजी इंटरप्राईजेस), शुद्धायू लाकडी तेलघाणा, अनमोल रेसीडेन्सी, अभिनंदन भन्साळी,(अवित्री बाइक्स इंडिया), पॉलीगोन इंडिया, सिंहगड फाऊंडेशन (पुणे), झावरेश नगरवाला, माजी सायकलिस्ट लाला कांबळे आणि यश ससे यांचे प्रायोजकत्व लाभले.



स्पर्धेतील विजेते
मास्टर गट (40 कि.मी.) प्रथम- खुद्दुस शेख, द्वितीय- रवी राजेश, तृतीय- हर्षल खांडवे, चतुर्थ – अकरम देवकाते, पाचवा- किरण पवार, सहावा- प्रविण पाटील.
मेन्स गट (40 कि.मी.) प्रथम- सुर्या थट्टू, द्वितीय- सिद्धेश पाटील, तृतीय- सुदर्शन देढगावकर, चौथा- रिहान शेख, पाचवा- अश्‍विनी मर्ढेकर, सहावा उमेश बंजारा
18 वर्षांखालील गट (20 कि.मी.)- प्रथम- मयंक पाखरे, द्वितीय- शुंभुराज यादव, तृतीय- आर्यन जाधव, चौथा- राजवर्धन शिंदे, पाचवा- शर्व वाळके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *