• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

बेरोजगार युवक-युवतींसाठी 45 दिवसीय मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

ByMirror

May 14, 2026
माय भारत व प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्राचा उपक्रम

माय भारत व प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्राचा उपक्रम


प्रशिक्षणानंतर त्वरित रोजगाराची संधी; 14 मेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी कौशल्याधारित प्रशिक्षणासह रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या माय भारत आणि प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन संचलित प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने 45 दिवसांच्या मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.


या उपक्रमांतर्गत प्लंबिंग मल्टी स्किल तसेच सीएनसी मशीन ऑपरेटिंग या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर युवक-युवतींना रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बेरोजगार तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष आणि प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्राच्या व्यवस्थापक दिवाकर भोयर यांनी केले आहे.


विशेष म्हणजे हे दोन्ही प्रशिक्षण कोर्स निवासी स्वरूपाचे असून, प्रशिक्षणादरम्यान राहण्याची व जेवणाची संपूर्ण व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना आवश्‍यक शैक्षणिक साहित्यही मोफत पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींनाही या प्रशिक्षणाचा लाभ घेणे सोपे होणार आहे.


या प्रशिक्षणासाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण अशी ठेवण्यात आली असून, निवडलेल्या कोर्सनुसार पात्रता निश्‍चित केली जाणार आहे. अर्जदारांचे वय 18 ते 30 वर्षांदरम्यान असणे आवश्‍यक आहे. प्रवेशासाठी मार्कशीट, आधार कार्ड, टी.सी. आणि सहा पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्‍यक राहणार आहेत.


प्रशिक्षणाचे आयोजन नगर-पुणे रोडवरील स्माईल स्टोन हॉटेलजवळ, कामरगाव (ता. नगर, जि. अहिल्यानगर) येथे करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून, नोंदणीची अंतिम तारीख 14 मे निश्‍चित करण्यात आली आहे. जागा मर्यादित असल्याने प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.


या कार्यशाळेत अनुभवी व प्रशिक्षित शिक्षकांकडून प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाणार आहे. तांत्रिक कौशल्यांसोबतच व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य आणि व्यावसायिक शिस्त यांसारख्या बाबींवरही विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्यास या उपक्रमाची मोठी मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. अधिक माहितीसाठी श्रीकृष्ण मुरकुटे (मो. 9225776995) यांच्याशी संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *