• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

माध्यमिक शिक्षक संघटनेचा बेमुदत संपाचा एल्गार

ByMirror

Apr 7, 2026
जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या बैठकीत निर्णय

समन्वय समितीसोबत माध्यमिक शिक्षक 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर -जिल्हाध्यक्ष सचिन झगडे


जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या बैठकीत निर्णय

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेची कार्यकारिणीची बैठक नुकतीच माध्यमिक शिक्षक भवनात पार पडली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन झगडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.
महाराष्ट्र शिक्षक फेडरेशनचे उपाध्यक्ष चांगदेवराव कडू यांनी जिल्हा संघटनेने फेडरेशनने ठरवून दिलेल्या दिशा निर्देशामध्ये काम केले पाहिजे असे आवाहन कार्यकारिणीला केले. संघटनेचे मार्गदर्शक शिवाजीराव ढाळे यांनी संघटनेच्या संघर्षाचा इतिहास आणि याआधी संघटनेने केलेल्या आंदोलनाचे यश यांचा आढावा घेतला.


माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे व राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष राजेंद्र लांडे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा व येणाऱ्या काळात संघटनेच्या दिशादर्शनाबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन झगडे यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्‍न त्यामध्ये सुधारीत पेन्शन योजना, टीईटीची सक्ती, संच मान्यतेच्या जाचक अटी, पट पडताळणीचे बदलेले निकष, कायम विना अनुदानित शाळांचे स्वयं अर्थसाहित शाळांमध्ये रूपांतरण, शिक्षकेतर बांधवांचे प्रश्‍न, सरकार जाणीवपूर्वक विविध प्रश्‍न निर्माण करून संघटना शिक्षकांमध्ये भेद निर्माण करत असल्याचे निदर्शनास आणून दिले. मध्यवर्ती कर्मचारी संघटना व समन्वय समितीच्या माध्यमातून होत असल्याने कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती मनात बाळगू नये. या पार्श्‍वभूमीवर केवळ शिक्षण क्षेत्रातीलच नव्हे तर समाजातील सर्व घटकांनी 21 तारखेपासून सुरू होणाऱ्या बेमुदत संपामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे निर्धार व्यक्त केला.


यावेळी बैठकीस मार्गदर्शक शिवाजीराव ढाळे, चेअरमन अप्पासाहेब शिंदे , राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र लांडे , राज्य उपाध्यक्ष चांगदेव कडू , उपाध्यक्ष भालचंद्र देशमुख (कर्जत), मोहन यादव (जामखेड), संदिप शेंडगे, खजिनदार अशोक सोनवणे (नेवासा), प्रशांत होन(श्रीरामपूर), माजी अध्यक्ष शिरीष टेकाडे, सचिन जाधव (कोपरगाव) तसेच जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक संघटनेचे सेक्रेटरी अमोल ठाणगे यांनी केले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष सोमनाथ सुंबे तर आभार हिशोब तपासणीस शिवदास सातपुते यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *