• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात पर्यावरणपुरक श्री गणेशाची स्थापना

ByMirror

Aug 29, 2025
ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वृक्षारोपण

गणेशोत्सवानिमित्त धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन


ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वृक्षारोपण

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शाडूच्या मातीच्या गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.


डोंगरे वस्ती येथे ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. यावेळी सचिव मंदाताई डोंगरे, राधिका डोंगरे, रघुनाथ डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, तेजस्विनी डोंगरे, स्वराज डोंगरे, कांचन डोंगरे, अंजनाबाई फलके, कार्तिक डोंगरे, अक्षय पवार, शिवाजी डोंगरे, किरण ठाणगे, दादा डोंगरे, रितेश डोंगरे आदी उपस्थित होते.


तसेच ग्रामपंचायत कार्यालय परिसरात सरपंच उज्वलाताई कापसे, उपसरपंच किरण जाधव, ग्रामपंचायत अधिकारी प्रविण पानसंबळ, डॉ. विजय जाधव, गणेश येणारे, उस्मान शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गणेश उत्सवानिमित्त निमगाव वाघात संस्थेच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

व्यसनमुक्ती व पर्यावरणाच्या जागृतीसाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. तर जनजागृतीसाठी पथनाट्याचे आयोजन करुन मतदार जागृती, स्त्री जन्माचे स्वागत, स्त्री सक्षमीकरण, व्यसनमुक्तीचा संदेश दिला जाणार आहे. गावात स्वच्छता अभियान देखील राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *