• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

विधान परिषदचे सभापती प्रा. राम शिंदे यांना निवेदन

ByMirror

Aug 12, 2025
विधान परिषदचे सभापती प्रा. राम शिंदे यांना निवेदन

शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करा -प्रसाद शिंदे

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील शिक्षक, शिक्षकेतरांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करावी यासंदर्भात स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना निवेदन दिले.


प्रा. शिंदे जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीला आले असता त्यांची भेट घेऊन प्रसाद शिंदे यांनी कॅशलेस मेडिक्लेम योजनेबद्दल लक्ष वेधले. कॅशलेस मेडिक्लेम योजना शिक्षक शिक्षकेतर वर्गासाठी अत्यंत आवश्‍यक बनली आहे. कॅशलेस मेडिक्लेम योजना शिक्षकांना लागू झाल्यावर शिक्षक बंधू भगिनींना मोठा आधार मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


जर एखादा शिक्षक आजारी पडला तर त्याला स्वत:च्या खिशातून खर्च करावे लागते. वेळप्रसंगी सोसायटीचे कर्ज काढून दवाखान्याचा खर्च भागवावा लागतो. बऱ्याच वेळा शिक्षकांकडे उपचारासाठी पैसे नसतात पैसे उभे करण्यात कुटूंबातील व्यक्तीना खूप त्रास सहन करावा लागतो. शासनाच्या नियमानुसार उपचार पूर्ण झाल्यावर फाईल जमा करू खर्च दिला जातो.

पण ही प्रक्रिया खूप वेळ खाऊ असल्याने शिक्षक वर्ग आर्थिक संकटात सापडतो. यामध्ये बदल होणे अपेक्षित आहे. येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावे आणि शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी केली आहे. याप्रसंगी स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *