• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

केडगावच्या जेएसएस स्कूलमध्ये जागतिक ध्यान दिवस साजरा

ByMirror

Dec 21, 2024
मानसिक आरोग्य व एकाग्रतेसाठी विद्यार्थ्यांनी गिरवले ध्यानधारणेचे धडे

मानसिक आरोग्य व एकाग्रतेसाठी विद्यार्थ्यांनी गिरवले ध्यानधारणेचे धडे

दररोज ध्यान केल्याने शरीर आणि मन संतुलित राहते -आनंद कटारिया

नगर (प्रतिनिधी)- केडगाव, मोहिनी नगर येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूल मध्ये शनिवारी (दि.21 डिसेंबर) जागतिक ध्यान दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी व अभ्यासात एकाग्रतेसाठी ध्यानधारणेचे विद्यार्थ्यांना धडे देण्यात आले.
स्कूलचे प्राचार्य आनंद कटारिया आणि निकिता कटारिया यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी वैशाली देशमुख, हर्षा कार्ले, बिना आरवडे, आरती राऊत, शितल भुजबळ, किर्ती सातपुते, शेख शिफा, वैशाली देशमुख आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आनंद कटारिया म्हणाले की, धान्य केल्याने मनाला शांती मिळते. अभ्यासात व कामात एकाग्रता वाढून तणाव देखील कमी होतो. निरोगी आरोग्यासाठी ध्यान करणे फायदेशीर आहे. दररोज योगा आणि ध्यान केल्याने शरीर आणि मन संतुलित राहते व शरीरार नेहमी ऊर्जा राहते. हे लक्षात घेऊन शाळेचा प्रत्येक दिवसाची सुरुवात ध्यान व योगाने होत असते. याचा फायदा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.


निकिता कटारिया म्हणाल्या की, स्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण देत असताना मुलांवर भारतीय संस्कृती व संस्कार रुजविण्याचे कार्य सुरु आहे. दररोज ध्यान व योगा करण्याचा पायंडा पाडण्यात आला आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीने ध्यान व योगा जगाला दिलेली मोठी देणगी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थ्यांना ध्यान करण्याचे फायदे सांगून, योग्य ध्यान करण्याची पध्दत प्रात्यक्षिकासह दाखविण्यात आली. या उपक्रमास सर्व शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *