• Thu. Mar 5th, 2026

अनामप्रेम संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप

ByMirror

Dec 14, 2024

दिव्यांगांना सहानुभूतीपेक्षा सन्मानाने आधार द्यावा -सचिन जाधव

नगर (प्रतिनिधी)- दिव्यांग मुले हे समाजातील घटक असून, त्यांना सहानुभूतीपेक्षा सन्मानाने आधार दिला पाहिजे. दिव्यागांना एका दिवसाच्या मदतीमधून मोठी मदत होणार नसली तरी, हा सामाजिक विचार रुजवला जाणार आहे. त्यांना आपल्यापणाने जवळ करणारे माणसे उभी राहिल्यास त्यांचे मनोधैर्य नक्कीच वाढणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी केले.


गांधी मैदान येथील स्नेहालय संचलित अनामप्रेम संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना सोपानराव वडेवालेचे संचालक अनिल महांकाळ यांच्या पुढाकाराने मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी जाधव बोलत होते. याप्रसंगी दिलदारसिंग बीर, युवा सेनेचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे, वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओमकार शिंदे, सचिन सापते, स्वप्निल बेद्रे, योगेश भोकरे, किरण डफळ आदी उपस्थित होते.


पुढे जाधव म्हणाले की, शिवसैनिक म्हणून समाजात कार्य करताना समाजकारण केले जात आहे. स्नेहालयाच्या सामाजिक कामांशी एक वेगळे ऋणानुबंध जोडले गेलेले आहेत. या संस्थेला हातभार लावण्यासाठी नेहमीच शिवसेना प्रयत्नशील राहणार आहे. तर या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करुन सोपानराव वडेवाले यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


अनिल महांकाळ म्हणाले की, सोपानराव वडेवाले हे संपूर्ण राज्यात एक ब्रॅण्ड झाला आहे. त्याचप्रमाणे स्नेहालय हा देखील देशाच्या पाठीवर एक समाजसेवेचा ब्रॅण्ड आहे. या समाजसेवेला हातभार लावण्याचे कार्य महांकाळ परिवार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *