• Sat. Jul 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

पै. नाना डोंगरे यांना क्रीडा रत्न पुरस्कार प्रदान

ByMirror

Oct 29, 2024
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल श्रीरामपूरच्या काव्य संमेलनात झाला सन्मान

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल श्रीरामपूरच्या काव्य संमेलनात झाला सन्मान

नगर (प्रतिनिधी)- क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल दोस्ती फाऊंडेशनच्या वतीने नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
श्रीरामपूर येथे झालेल्या काव्य संमेलनात माजी शिक्षणाधिकारी तथा कवी धोंडीरामसिंह राजपूत व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तथा कवी सुभाष सोनवणे यांच्या हस्ते डोंगरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी काव्य संमेलनाच्या अध्यक्षा रंजनाताई बोरा, ह.भ.प. सुनिताताई वाळूंज, साहित्यिक सुनिता कपाळे, फाऊंडेशनचे अध्यक्ष रज्जाक शेख, श्रीपाद मेहेंदे, मिराबक्ष शेख, आनंदा साळवे, देवीदास बुधवंत, अवीज शेख, परवेज शेख आदींसह साहित्यिक व कवी उपस्थित होते.


निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे मागील तीस ते चाळीस वर्षापासून क्रीडा क्षेत्रात योगदान देत आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ते विविध स्पर्धा घेत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राष्ट्रीय कुस्तीपटू घडले असून, नवोदित खेळाडूंना चालना देण्याचे ते सातत्याने प्रयत्न करत आहे. जिल्हा तालिम संघाच्या माध्यमातून राज्यस्तरावर कुस्तीचे संघ व्यवस्थापक म्हणून देखील ते काम पाहत असतात. त्यांची क्रीडा क्षेत्रातील कार्य व योगदानाची दखल घेऊन त्यांना क्रीडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल डोंगरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *