• Sat. Jul 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

पै. नाना डोंगरे यांना क्रीडा रत्न पुरस्कार जाहीर

ByMirror

Oct 20, 2024

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल दोस्ती फाऊंडेशनच्या वतीने होणार सन्मान

नगर (प्रतिनिधी)- क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांना दोस्ती फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डोंगरे यांच्या क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना पुरस्काराची घोषणा फाऊंडेशनचे अध्यक्ष रज्जाक शेख यांनी केली.


श्रीरामपूर येथे 27 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात माजी शिक्षणाधिकारी धोंडीराम राजपूत, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते फ्रान्सिस संसारे, मिराबक्ष शेख, ह.भ.प. सुनिताताई वाळूंज, साहित्यिक सुरेखा कपाळे आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये डोंगरे यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.


निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे मागील तीस ते चाळीस वर्षापासून क्रीडा क्षेत्रात योगदान देत आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ते विविध स्पर्धा घेत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राष्ट्रीय कुस्तीपटू घडले असून, नवोदित खेळाडूंना चालना देण्याचे ते सातत्याने प्रयत्न करत आहे. जिल्हा तालिम संघाच्या माध्यमातून राज्यस्तरावर कुस्तीचे संघ व्यवस्थापक म्हणून देखील ते काम पाहत असतात. त्यांची क्रीडा क्षेत्रातील कार्य व योगदानाबद्दल क्रीडा रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डोंगरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *