• Mon. Feb 16th, 2026

प्रसिध्द गायक मुख्तार शाह यांचे शहरात स्वागत

ByMirror

Oct 28, 2024

धनेश बोगावत यांच्या वतीने सत्कार

नगरकरांच्या पाहुणचाराने शाह भारावले

नगर (प्रतिनिधी)- प्रसिध्द गायक मुख्तार शाह यांचे शहरात संगीत रसिक धनेश बोगावत यांनी स्वागत केले. प्रेमदान चौकातील स्विट होम मध्ये शाह यांचा सत्कार करुन त्यांच्याशी गप्पागोष्टी रंगल्या होत्या. यावेळी उद्योजक रवी बक्षी, प्रसाद शेटे आदी उपस्थित होते.


देशभरात व परदेशात स्व. मुकेश यांचे प्रतिगायक अशी ओळख मिळवलेले मुख्तार शाह एका कार्यक्रमानिमित्त शहरात आले असता, नगरकरांच्या पाहुणचाराने ते भारावले. शहराला मोठा इतिहास असून, अनेक कलावतांचा वारसा या मातीला लाभला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात कलारसिक असून, सातत्याने विविध संगीय व गायनाचे कार्यक्रम नगरमध्ये रंगत असल्याची माहिती बोगावत यांनी दिली. तर शाह यांना आजच्या काळातील मुकेश म्हणून पाहिले जात असल्याचे स्पष्ट करुन त्यांच्या गायनाचे कौतुक केले.


गायक मुख्तार शाह यांनी नगरकरांचे मिळालेले प्रेम नेहमीच स्मरणात राहणार आहे. येथील आदरतिथ्य व दिलेल्या सन्मानाने भारवलो असल्याचे सांगितले. तसेच बोगावत यांनी आपले दिवंगत वडिल छगनशेठ बोगावत हे देखील एक उत्तम कलाकार व संगीतप्रेमी होते. त्यांचा वारसा पुढे चालवत नवोदित कलाकारांना विविध प्रकारे प्रोत्साहन देऊन त्यांना पाठबळ दिले जात असल्याचेही सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *