सप्तसूर परिवारातील डॉक्टरांची सुरमयी पहाट रंगणार
कलाप्रेमी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- शहरातील सप्तसूर परिवाराच्या वतीने बुधवारी (दि.30 ऑक्टोबर) पहाटे 6:30 वाजता स्वर दीपावली हा सुमधुर मराठी व हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सावेडी येथील माऊली संकुल सभागृहात रंगणार आहे. संगीत, गायन क्षेत्रात योगदान देणारे अहिल्यानगर मधील प्रतिष्ठित डॉक्टर आपल्या कलेचे सादरीकरण या कार्यक्रमात करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी निशुल्क असून, कलाप्रेमी नागरिकांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सप्तसूरच्या वतीने करण्यात आले आहे.
गायन क्षेत्राची आवड असलेल्या डॉक्टर मंडळींनी एकत्र येऊन सप्तसूर या संस्थेची अधिकृत नोंदणी केलेली असून, या संस्थेच्या माध्यमातून विविध संगीत मैफलचे आयोजन केले जाते. दरवर्षी संस्थेच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रम घेण्यात येत असून, या पार्श्वभूमीवर स्वर दीपावलीचा कार्यक्रम होणार आहे.
अनेक वर्षापासून डॉक्टर मंडळींचा गायनाचा रियाज सुरु असून, विविध कार्यक्रम शहरात घेतले जातात. बुधवारी होणाऱ्या स्वर दीपावली कार्यक्रमात कलाकार डॉ. विलास जोशी, डॉ. अभिजीत पाठक, डॉ. योगिनी वाळिंबे, डॉ. प्रकाश टेकवाणी, डॉ. स्मिता केतकर, डॉ. बाळासाहेब देवकर, सौ. पल्लवी जोशी, डॉ. शिरीष कुलकर्णी, डॉ. प्रीती नाईक, डॉ. नीरज करंदीकर, सौ. दीप्ती करंदीकर, डॉ. रोहिणी काळे, डॉ. अविनाश वारे, डॉ. दीपा मोहोळे, डॉ. सरोज भिडे, डॉ. संगीता कुलकर्णी, डॉ. सचिन पानपाटील, सौ. ज्योती दीपक, डॉ. रेशमा चेडे, डॉ. सीमा गोरे, डॉ. प्राची पाटील, डॉ. सत्तार सय्यद गायन करणार आहेत. वादक म्हणून दिलावर शेख, सत्यजित सराफ, डॉ. गीता करंदीकर, अजित गुंदेचा, अजय साळवे, ओंकार साळवे, ऋतुजा पाठक, तुषार दुबे यांची साथसंगत लाभणार आहे.
