• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात श्री क्षेत्र दैठणे गुंजाळच्या खंडेश्‍वर दिंडीचे स्वागत

ByMirror

Jul 10, 2024
निमगाव वाघात श्री क्षेत्र दैठणे गुंजाळच्या खंडेश्‍वर दिंडीचे स्वागत

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र दैठणे गुंजाळ येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या श्री खंडेश्‍वर दिंडीचे निमगाव वाघा (ता. नगर) येथे येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व निमगाव वाघा ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.


दिंडीच्या स्वागताला पद्मश्री पोपट पवार यांनी हजेरी लावून वारकऱ्यांना चांगल्या पावसासाठी पांडुरंग चरणी प्रार्थना करण्याचे आवाहन केले व निघालेल्या दिंडीस शुभेच्छा दिल्या. दिंडीतील वीणेकरी ह.भ.प. बबन गुंजाळ यांचा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांनी सत्कार केला.


यावेळी सरपंच साहेबराव बोडखे, नामदेव फलके, भागचंद जाधव, दिंडी चालक बापूसाहेब गुंजाळ, भाऊसाहेब जाधव, संतोष फलके, बापू फलके, ह.भ.प. भाऊसाहेब शिंदे, गोरख शिंदे, बन्सी महांडुळे, रो.ना. पादीर, शिवाजी पवार, राजू पवार, संदीप डोंगरे, सिताराम येवले, रवी फलके, धर्मा ठाणगे, अशोक गुंजाळ, भिवा गुंजाळ, किसन कळमकर, सुशांत फलके, सचिन फलके आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिंडीतील वारकऱ्यांना गावात अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *