• Wed. Jun 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

नाना डोंगरे यांना जय भगवान युवा प्रतिष्ठानचा आदर्श कार्यगौरव पुरस्कार जाहीर

ByMirror

Oct 21, 2023

रविवारी निंबादैत्य नांदूर येथे होणार सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- जय भगवान युवा प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक आजिनाथ दहिफळे यांनी डोंगरे यांच्या पुरस्काराची घोषणा केली.


जय भगवान युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी डोंगरे यांना सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे शाळेत कार्यरत असून, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरु आहे. ग्रामीण भागात वृक्षरोपण, बीजरोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध कार्यक्रम घेऊन त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी मोठी जनजागृती केली आहे. डोंगरे यांनी जिल्हा पातळीवर स्त्री जन्माचे स्वागत, वृक्षरोपण, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जागृती, जलसंधारण जागृती मोहिम व रक्तदान शिबीर व्यापक स्वरुपात राबविले. व्यसनमुक्तीचे उपक्रम राबवून युवकांना दिशा देण्याचे कार्य सुरु आहे.

विविध स्पर्धा, महिला बचत गट मेळावे, काव्य व युवा संमेलन घेऊन समाजाला दिशा देण्याचे कार्य ते करत आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे. रविवारी (दि.22 ऑक्टोबर) निंबादैत्य नांदूर (ता. पाथर्डी) येथे मान्यवरांच्या हस्ते डोंगरे यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डोंगरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *