• Wed. Jun 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार

ByMirror

Oct 21, 2023

डोंगरे यांचे निस्वार्थ सामाजिक कार्य कौतुकास्पद -राजेंद्र सानप

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते पै.नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव पुरस्कार व राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी त्यांचा सत्कार केला.


जय भगवान युवा प्रतिष्ठान व जळगाव येथील आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डोंगरे यांना नुकताच सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे शाळेत कार्यरत असून, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरु आहे.

ग्रामीण भागात वृक्षरोपण, बीजरोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध कार्यक्रम घेऊन त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी मोठी जनजागृती केली आहे. डोंगरे यांनी जिल्हा पातळीवर स्त्री जन्माचे स्वागत, वृक्षरोपण, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जागृती, जलसंधारण जागृती मोहिम व रक्तदान शिबीर व्यापक स्वरुपात राबविले. व्यसनमुक्तीचे उपक्रम राबवून युवकांना दिशा देण्याचे कार्य सुरु आहे. विविध स्पर्धा, महिला बचत गट मेळावे, काव्य व युवा संमेलन घेऊन समाजाला दिशा देण्याचे कार्य ते करत आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे.


विविध क्षेत्रात डोंगरे यांचे निस्वार्थ भावनेने सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट करुन, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *