• Tue. Jun 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

हेल्पिंग हॅण्डस्‌ फॉर हंगर्स ग्रुपचा वर्धापन दिवस रक्तदानाने साजरा

ByMirror

Oct 2, 2023

सामाजिक कार्यकर्ते व संस्थांचा गौरव

सामाजिक बांधिलकी जपत लोकसहभागाने सेवा कार्य सुरु – बाळासाहेब (नाना) भोरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सेवाभावाने गरजूंना जेवण पुरविणाऱ्या हेल्पिंग हॅण्डस्‌ फॉर हंगर्स ग्रुप या संस्थेचा चौथा वर्धापन दिवस रक्तदानाने साजरा करण्यात आला. तर सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्ती व सामाजिक संस्थाना सन्मानित करण्यात आले.


या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब (नाना) भोरे, राजेंद्र मालू, किशोर कुलकर्णी, अविनाश मुंडके, अशोक साळुंके, वर्षा शेकटकर, मनिषा शिंदे, आशुतोष देवी, अजय गांधी, वर्षा शेकटकर, प्रशांत देशपांडे, राजू मंगलाराम, मनोज गुजराथी, दीप्ती पाटील, अनंत रीसे, विष्णू देशमुख आदी उपस्थित होते.


संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब (नाना) भोरे प्रस्ताविकात म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सुरु झालेली ही सेवा आज पर्यंत सुरु आहे. अनेक गरजूंना अल्पदरात जेवण पुरविण्यात येत आहे. तर चिपळूण येथे महापुरात लोकांना मदत देऊन जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सामाजिक बांधिलकी जपत लोकसहभागाने हे सेवा कार्य सुरु असून, कार्याचे विस्तार करण्यासाठी भोजन गृह उभारणीचे कार्य सुरु असल्याचे स्पष्ट करुन संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. तर समाजकार्यासाठी विविध स्तरातून मिळालेल्या मदतीची त्यांनी माहिती दिली.


या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तर सामाजिक कार्यात निस्वार्थ भावनेने योगदान देणारे सामाजिक कार्यकर्त्या अनिता माने, ट्रेक कॅम्पचे विशाल लाहोटी, बेटी बचाव चळवळीचे नरेश कोटा, बालघर प्रकल्पाचे युवराज गुंड, सद्गुरु श्री साहेबराव आवारे फाऊंडेशनचे अनिकेत आवारे, चांदबिबी मॉर्निंग ग्रुपचे मोहनशेठ लुल्ला, त्रिवेणी माजी सैनिक महिला बचत गटाच्या आशा साठे, निरंजन सेवाभावी संस्थेचे स्वप्निल कुलकर्णी यांच्यासह अहमदनगर ट्रेकर्स, निसर्गसृष्टी गोपालन संस्था, वसुंधरा ग्रुप या संस्थांना गौरविण्यात आले.


हेल्पिंग हॅण्डस्‌ फॉर हंगर्स ग्रुपच्या माध्यमातून शहर व उपनगरातील गरजूंना 20 रुपये मध्ये पोटभर जेवण दिले जात आहे. ज्यांच्याकडे पैसे नाहीत, अशा गरजूंना तसेच डायलिसिस रुग्णांना मोफत जेवण दिले जाते. संस्थेच्या माध्यमातून या सामाजिक कार्याचा विस्तार केला जात असल्याची माहिती ग्रुपच्या वतीने देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा शिंदे यांनी केले. आभार संजय खोंडे यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *