• Sun. Jun 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

गोविंद गायकवाड यांची भाजप युवा मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

ByMirror

Jun 28, 2026
गोविंद गायकवाड यांची भाजप युवा मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार; प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी गोविंद शिवाजीराव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षसंघटनेत सातत्याने केलेले कार्य, युवकांमधील सक्रिय सहभाग आणि संघटनात्मक बांधिलकीची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते गोविंद गायकवाड यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस निखिल वारे, नगरसेवक करण कराळे, महेश लोंढे, सुजय मोहिते, युवा मोर्चाचे सरचिटणीस कैलास गर्जे, उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, सचिव सुयश नरसाळे, विजय भालेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील, युवा मोर्चाचे प्रदेश प्रभारी सुनील राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते आणि भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. ऋद्रेश अंबाडे यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
गोविंद गायकवाड यांनी पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी युवकांना मोठ्या प्रमाणात भाजपशी जोडण्याचे काम करणार आहे. शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, सामाजिक उपक्रम राबविणे आणि जनतेच्या प्रश्‍नांसाठी सातत्याने आवाज उठविणे आणि भाजप सरकारच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


गोविंद गायकवाड यांनी यापूर्वी विविध सामाजिक उपक्रम, पक्ष संघटन वाढविण्याचे प्रयत्न आणि युवकांना भाजपच्या विचारांशी जोडण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या सक्रिय कामाची दखल घेत त्यांना शहर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. या निवडीबद्दल भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी गोविंद गायकवाड यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *