• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना मानव अधिकार कायद्याचे मार्गदर्शन

ByMirror

Dec 18, 2022

मनुष्याला त्याच्या हक्काची जाणीव करुन देणे आवश्यक -रोहिदास महाराज जाधव

फेडरेशनच्या नगर तालुका अध्यक्षपदी घनश्याम म्हस्के यांची निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना मानव अधिकार कायद्या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. सनफार्मा विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे प्रारंभ नुकतेच निंबळक (ता. नगर) येथील श्री हरीहर महाराज संस्थान येथे झाले. या कार्यक्रमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मानव अधिकार व हक्काचा जागर करण्यात आला.


जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या नगर तालुका अध्यक्षपदी घनश्याम म्हस्के यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष रोहिदास महाराज जाधव, शहराध्यक्ष दिलीप साळवे, हरीहर महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज निकम, दगडू तांबे, सागर मोरे, भानुदास शेळके, शालेय शिक्षक हेमंत पवार, अमोल सप्रे, आशा गुंड, प्रा. विठ्ठल बुलबुले, प्राचार्य सतीश बनसोडे आदींसह राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.


विजय भालसिंग म्हणाले की, मानवाधिकार व त्याची मुल्य जोपासण्याचे काम जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन करत आहे. महागाई, गरिबी व बेरोजगारीच्या प्रश्‍नांमुळे सर्वसामान्य भरडला जात असताना, त्यांच्यावर अन्याय-अत्याचर होत आहे. हा अन्याय दूर करुन त्यांचे हक्क अबाधित ठेवण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


रोहिदास महाराज जाधव म्हणाले की, समाजात न्याय व अन्याय समजल्यास वंचितांना न्याय मिळवून देता येणार आहे. मनुष्याला त्याच्या हक्काची जाणीव करुन देण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून सुरु आहे. युवकांनी या चळवळीशी जोडले जाऊन समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी मानव अधिकाराची समाजात जागृती करण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच मानवाधिकार कायद्याबद्दल माहिती दिली.

शहराध्यक्ष दिलीप साळवे यांनी घनश्याम म्हस्के यांची नगर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. घनश्याम म्हस्के निंबळकचे माजी उपसरपंच व सोसायटीचे सदस्य आहे. त्यांचे राजकीय व सामाजिक कार्याबद्दल त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर व इतर पदाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *