• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

शंभूराजे प्रतिष्ठानची मतीमंद मुलांच्या निवासी शाळेला अन्न-धान्याची मदत

ByMirror

Dec 17, 2022

प्रत्येकाने सामाजिक जाणीव ठेऊन योगदान देण्याची गरज -संतोष वाणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने तपोवन रोड येथील मतीमंद मुलांच्या निवासी शाळेत अन्न-धान्याची मदत करण्यात आली. तर मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. प्रगतशील शेतकरी कै. शंकर भाऊ वाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.


या कार्यक्रमाप्रसंगी उद्योजक संतोष वाणी, उद्योजक गणेश वाणी, धनंजय तागड, कुंडलिकराव ढवण, प्रशांत शिंदे, अमर निक्रड, चैतन्य वाणी, ओम वाणी, तेजश्री निक्रड, गायत्री वाणी, पूजा वाणी आदींसह वाणी परिवारातील सदस्य व शंभूराजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.


संतोष वाणी म्हणाले की, प्रत्येकाने सामाजिक जाणीव ठेऊन योगदान देण्याची गरज आहे. दीनदुबळ्यांना आधार दिल्यास समाजातील प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. वडिलांनी देखील गरजूंना मदत करण्याची नेहमीच शिकवण दिली. खर्‍या गरजूंना मदत मिळाल्यास ती मदत सार्थकी लागते. ही जाणीव ठेऊन हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.


गणेश वाणी म्हणाले की, वाढदिवस, सण, उत्सव व इतर धार्मिक कार्यक्रमांना सामाजिक उपक्रमाची जोड दिल्यास वंचितांना आधार मिळणार आहे. वंचित व दुर्बल घटकांना प्रगतशील शेतकरी कै. शंकर वाणी यांनी नेहमीच आधार देण्याचे कार्य केले होते. त्यांच्या विचारांचा वारसा वाणी परिवार व शंभूराजे प्रतिष्ठान सामाजिक योगदानाने चालवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *