• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

म्हाडाच्या गाळ्यात दिव्यांगाचा आरक्षीत कोटा न दिल्यास प्रकल्पासमोर दिल्यांगांच्या टपर्‍या लावणार

ByMirror

Nov 14, 2022

सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रेमदान चौकातील नाशिक गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाकडून बांधण्यात आलेल्या 40 व्यावसायिक गाळ्यांच्या विक्रीत दिव्यांगांना डावलून त्यांच्या हक्काचे 5 टक्के आरक्षणावर गडांतर आणले आले. या प्रकल्पात दिव्यांगाचा 5 टक्के आरक्षीत कोटा न दिल्यास प्रकल्पासमोर दिल्यांगांच्या टपर्‍या लावून आंदोलन करण्याचा इशारा सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांनी दिला आहे.

बाबासाहेब महापुरे


दिव्यांग अधिकार कायदा 2016 नुसार विशेष योजना व विकास कार्यक्रमांतर्गत शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांनी भेदभाव न करता दिव्यांगांना समान संधी देणे गरजेचे असताना, त्यांचे आरक्षण न दाखवल्याने त्यांना हक्काच्या संधी पासून दूर ठेवण्यात आलेले आहे. दिव्यांगाचे हक्काचे 5 टक्के प्रमाणे गाळे देणेसाठी पुन्हा नव्याने सुधारीत निविदेची जाहिरात प्रकाशित करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करुन, सदर मागणीचे निवेदन नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ मुख्य अधिकारी यांचेकडे पाठविण्यात आले आहे.

नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ नाशिक अंतर्गत येणार्‍या अहमदनगर शहरातील प्रेमदान चौक परिसरात म्हाडाने 8 कोटी रुपये खर्च करुन 40 व्यावसायिक गाळे उभारले आहे. या गाळ्यांची एक रक्कम पद्धतीने खरेदी करण्यासाठी पात्र अर्जदारांकडून सीलबंद निविदा मागवणारी जाहिरात नुकतीच प्रकाशित झालेली आहे. सदरील जाहिरातीत बिल्डिंगमध्ये सर्व प्रवर्गातील आरक्षण दिलेले आहे. परंतु दिव्यांगाचे आरक्षण डावलल्याने दिव्यांगमध्ये प्रचंड असंतोष असून, त्यांच्या अधिकारावर गदा आणलेली आहे. म्हाडाच्या इतर प्रकल्पात दिव्यांगांना 5 टक्के आरक्षण ठेवले जात असताना, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ अंतर्गत येणार्‍या अहमदनगर शहरातील सावेडी प्रेमदान चौक येथील व्यापारी गाळ्यांच्या विक्रीत त्यांना डावलले जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

म्हाडा प्रकल्पामध्ये दिव्यांगाचे आरक्षण नसल्याने सदर प्रकल्पाला स्थगीती देण्याची विनंती राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्याकडे केलेली आहे. आयुक्तांच्या निर्णयाकडे आमचे लक्ष असून, सकारात्म निर्णय न झाल्यास दिव्यांगांना न्याय, हक्कासाठी आंदोलन करावे लागणार आहे. -बाबासाहेब महापुरे (अध्यक्ष, सावली दिव्यांग संघटना)

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *