• Fri. Jul 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

अरणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नम्रता कांबळे यांची निवड

ByMirror

Jul 16, 2026
दरेवाडी गणातील राजकीय हालचालींना वेग

दरेवाडी गणातील राजकीय हालचालींना वेग


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अरणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नम्रता दिगूभाऊ कांबळे यांची निवड झाल्याने दरेवाडी गणातील राजकीय वातावरणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर या निवडीकडे राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण घडामोडी म्हणून पाहिले जात आहे.
दिगू कांबळे यांचे मोठे बंधू राहुल कांबळे (माया) यांची भूमिका या उपसरपंच निवडीमध्ये महत्त्वाची ठरली. राहुल कांबळे यांचा मित्र परिवार मोठा असून शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य सुरु आहे. अरणगाव ही मोठ्या लोकसंख्येची ग्रामपंचायत असून, उपसरपंचपदी झालेल्या या निवडीमुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


गावातील विद्यमान सरपंच पोपट पुंड, उपसरपंच विठ्ठल दळवी,ग्रामपंचायत सदस्य,सोसायटीचे पदाधिकारी, विविध समाजघटकांतील मान्यवर तसेच युवकांच्या सहकार्याने गावाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. उपसरपंच निवडीनंतर झालेल्या सत्कार सोहळ्यास ज्येष्ठ नेते प्रवीण चाबुकस्वार,दिलीप कांबळे, इकेश कांबळे, माजी उपसरपंच संपत कांबळे, मोहिनीताई जाधव, प्रतिभाताई थोरात, स्वातीताई शिंदे, नंदाताई करांडे, ग्रामपंचायत सदस्य अंजुम सय्यद, मारुती आमले, तसेच मयूर जगताप, ईश्‍वर फसले, बापू शिंदे, अर्जुन पुंड, साहिल गायकवाड, किरण कांबळे, मंगेश भिंगारदिवे, ऋतिक कांबळे, सागर भांबळ, शंकर सूर्यवंशी, मेहेर राजू, योगेश कांबळे, सुमित माळवे, आदेश कांबळे, श्रीकांत रोहकले, शाक्य कांबळे, सुरज कांबळे, स्यामी देठे, सिमी कांबळे, समर्थ कांबळे, संग्राम कांबळे, सुदाम साळवे, राजू पवार, प्रेम गौतम कांबळे, सतीश जयदेव कांबळे, पियुष कांबळे, अश्‍विन कांबळे, संदेश साळवे, आकाश साळवे, किशोर शिंदे, शेखर साळवे, सागर जावळे, मेहेर कांबळे, वीर जाधव, संग्राम कांबळे, राज भिंगारदिवे, आरपीआय ज्येष्ठ नेते महेंद्र कांबळे (अंकल) यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *