• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या योजनांच्या खर्चाची दप्तर तपासणी व्हावी

ByMirror

Jan 7, 2023

खर्चात अनियमितता असल्याने मोठा अपहार उघडकीस येण्याचा छावा ब्रिगेडचा दावा

महालेखापाल स्तरावरून चौकशी करुन दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रा), निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान या योजनांच्या खर्चाबाबत मोठ्या प्रमाणात अनियमितता असून, त्याची महालेखापाल (मुंबई) स्तरावरून चौकशी समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी छावा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाध्यक्ष योगेश शेटे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.


अहमदनगर जिल्हा परिषद राष्ट्रीय ग्रामीण पेजल योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रा), निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान या सर्व योजनांच्या खर्चाबाबत मोठ्या प्रमाणात अनियमित्ता झाली आहे. याची चौकशी जिल्हा परिषद अहमदनगर येथील अधिकारी, कर्मचारी यांच्या स्तरावरून न करता महालेखापाल (मुंबई) शासनाच्या स्तरावरून विशेष चौकशी समिती गठित करून करण्यात यावी.

सदर योजनेत मोठा अपहार उघडकीस येण्याची शक्यता आहे. चौकशीसाठी नोंदवही व हिस्ट्री नोंदवही यातील 1 जून 2018 ते 31 मे 2021 पर्यंत दप्तर तपासणी केल्यास झालेला अपहार निष्पन्न होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


या योजनांमध्ये झालेल्या अपहारास जबाबदार असणार्‍या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी छावा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *