• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

आमदार बच्चू कडू यांची आमदारकी रद्द होण्यासाठी उपोषण

ByMirror

Mar 29, 2023

सामाजिक कार्यकर्ते भिंगारदिवे यांची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षाचे शिक्षा ठोठावल्यामुळे त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी बुधवारी (दि.29 मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. आमदारकी रद्द होईपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.


आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने 8 मार्च 2023 रोजी दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तरीदेखील विधिमंडळ सचिवांनी त्यांची आमदारकी रद्द केलेली नसल्याचे भिंगारदिवे यांनी निवेदनात म्हंटले आहे. दोन वर्षाचे शिक्षा ठोठावल्यामुळे आमदार बच्चू कडू यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी भिंगारदिवे यांनी उपोषण सुरु केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *