• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

हरदिन मॉर्निंग ग्रुपचे वृक्षरोपणाने पर्यावरण दिन साजरा

ByMirror

Jun 5, 2023

प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत, नागरिकांना दिली पर्यावरण रक्षणाची शपथ

सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व प्लास्टिक मुक्ती हा एकमेव पर्याय -संजय सपकाळ

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्क मध्ये वृक्षरोपण करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. तर परिसरात स्वच्छता अभियान राबवून पर्यावरणाला घातक ठरत असलेल्या प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला व नागरिकांसह पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली. यावेळी लावलेल्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी देखील ग्रुपच्या सदस्यांनी घेतली.


प्रारंभी मेजर संतोष वीर, राजू कांबळे व पवन वाघमारे यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन या अभियानाची सुरुवात करण्यात आली. उद्यानाच्या ठिकठिकाणी झाडांची लागवड करण्यात आली.

यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, मेजर दिलीप ठोकळ, रमेश साके, गणेश भोर, सचिन चोपडा, सुभाष गोंधळे, सर्वेश सपकाळ, दिलीप गुगळे, एकनाथ जगताप, विकास भिंगारदिवे, अभिजीत सपकाळ, सरदारसिंग परदेशी, बापूसाहेब तांबे, अशोक पराते, प्रकाश देवळालीकर, संजय वाकचौरे, सुमेश केदारे, विलास तोतरे, मुन्ना वाघस्कर, अविनाश जाधव, विठ्ठल राहींज, अविनाश काळे, सिताराम परदेशी, किशोर भगवाने, माजिद शेख, सूर्यकांत कटोरे, किरण फुलारी, केशवराव दवणे, जालिंदर अळकुटे, कुमार धतुरे, विलास आहेर, राहुल दिवटे, हरी शेलार, योगेश चौधरी, राजू शेख, विशाल भामरे, अशोक भगवाने, सचिन कस्तुरे, राहुल भिंगारदिवे, कैलास भिंगारदिवे, हंस वाघमारे, उषाताई ठोकळ, मीनाक्षी खोगरे, रोशनी वाघमारे, अजेश पुरी, आसाराम बनसोडे आदी उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची गरज आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, जमिनीची धूप थांबविण्यासाठी तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून मानवाचे जीवन वृक्षरोपणाने सुरक्षित करता येणार आहे. औद्योगिकरणामुळे एकीकडे विकास होत आहे, तर दुसरीकडे पर्यावरणाचा र्‍हास होत चालला आहे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने प्लास्टिकचा कचरा पर्यावरणासह पशु-प्राण्यांना हानी पोहचवत आहे. प्लास्टिक बंदीसाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेण्याची गरज आहे. पर्यावरण रक्षण म्हणजेच सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व प्लास्टिक मुक्ती हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *