• Tue. Jun 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

साई सर्जिकल अ‍ॅण्ड हेअरिंग सर्व्हिसेसचा मंगळवारी नूतनीकरण झालेल्या दालनाचा शुभारंभ

ByMirror

Jun 16, 2023

परदेशातील अद्यावत तंत्रज्ञान अवगत करुन केवळ यांची दुसरी पिढी सेवेसाठी सज्ज

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सर्वप्रथम श्रवण यंत्राची सेवा देणार्‍या साई सर्जिकल अ‍ॅण्ड हेअरिंग सर्व्हिसेसच्या पत्रकार चौक येथील नूतनीकरण केलेले दालन नगरकरांच्या सेवेत दाखल होत आहे. 1982 साली मंगेश केवळ यांनी सुरु केलेल्या या दालनात त्यांची दुसरी पिढी नितांत मंगेश केवळ सेवा देणार आहेत.


या नूतनीकरण दालनाचा शुभारंभ मंगळवारी (दि.20 जून) रोजी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.


पूर्वी श्रवण दोष असलेल्या रुग्णांना तपासणी व मशीन घेण्यासाठी मुंबई व पुणे येथे जावे लागत असे. मंगेश केवळ यांनी ग्राहकांची गरज ओळखून शहरातच 1982 मध्ये साई सर्जिकल अ‍ॅण्ड हेअरिंग सर्व्हिसेस हे दालन सुरु केले. प्रारंभी जर्मनीतील श्रवण यंत्र भारतात उपलब्ध नव्हते. त्याकाळी मंगेश केवळ श्रवण दोष असलेल्यांना सदर मशीन उपलब्ध करुन देत होते. हळूहळू जागतिकीकरण झाले आणि जगातील सर्व टेक्नॉलॉजीचे मशीन भारतामध्ये मिळू लागले. सुरुवातीला सिमेन्स कंपनी सर्व प्रकारचे मशीन विकायची. त्यामध्ये अहमदनगर मधील एकमेव डीलर म्हणून साई सर्जिकल अ‍ॅण्ड हेअरिंग सर्व्हिसेसची निवड झाली होती.


मंगेश केवळ यांच्या तब्बल 40 वर्षाच्या सेवेनंतर त्यांची दुसरी पिढी म्हणजे त्यांचा मुलगा नितांत मंगेश केवळ हा देखील श्रवण दोष असलेल्या रुग्णांना सेवा देण्यासाठी अद्यावत तंत्रज्ञान अवगत करुन सज्ज झाला आहे. नितांत केवळ याने पुण्यात चार वर्षाचा बॅचलर कोर्स पूर्ण करून इंग्लंडमध्ये मास्टर कोर्स पूर्ण केला आहे. त्याने इंग्लंडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस केली असून, वेगवेगळ्या वयोगटातील श्रवण दोष असलेले व्यक्ती अनुभवले. परदेशातील उच्च तंत्रज्ञान व अनुभव घेऊन शहरात तो आपली सेवा देणार आहे. साई सर्जिकल अ‍ॅण्ड हेअरिंग सर्व्हिसेसच्या यशाचे गमक म्हणजे प्रामाणिकपणा, कोणालाही न फसविणे तसेच विक्रीनंतरची सर्वोत्कृष्ट सेवा हेच असल्याचे मंगेश केवळ यांनी आवर्जून सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *