• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

सावेडीच्या जॉगिंग ट्रॅकवर रविवारी रंगणार योग सोहळा

ByMirror

Jun 16, 2023

महापौर शेंडगे यांनी केली मैदानाची पहाणी

नगरकरांना सहभागी होण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक योग दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि.18) जून रोजी सावेडी उपनगरातील जॉगिंग ट्रॅक येथे कर्मयोगी योगा स्टुडिओ व अहमदनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने योग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी पहाणी केली. यावेळी मनपा आयुक्त पंकज जावळे, योगा थेरेपिस्ट व प्रशिक्षिका गायत्री गारडे, क्रीडा भारतीचे अध्यक्ष निर्मल थोरात, मोहसीन सय्यद, अशोक झोटिंग, राजदीप गारडे, बाळकृष्ण गारडे, श्रीराम दिवटे आदी उपस्थित होते.


जागतिक योग दिनानिमित्त या दिमाखदार योग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मैदानाची पहाणी करुन स्टेज उभारणी, साऊंड सिस्टिम आदी सुविधांबाबत सूचना देण्यात आल्या. स्पर्धेच्या व धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती व्यायामापासून दुरावत असून, ताण-तणावाखाली वावरत आहे. चुकीची आहार पध्दती, व्यायामाचा अभाव व तणावपूर्ण जीवनामुळे बहुतेकांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे.

जीवन निरोगी व शरीर सदृढ राहण्यासाठी नागरिकांमध्ये योग-प्राणायामाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी, पोलीस व सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच विविध स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. नगरकरांना या योग सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नांव नोंदणी आवश्यक असून, या मोबाईल क्रमांकावर 7588029714 व 8208704411 नाव नोंदणी करण्याचे सांगण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *