• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

नशामुक्ती भारत पंधरवडा उपक्रमातंर्गत व्यसनमुक्तीची शपथ

ByMirror

Jun 17, 2023

डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण वाचनालयाचा उपक्रम

सक्षम भारताच्या निर्माणासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज -पै. नाना डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- नशामुक्ती भारत पंधरवडा उपक्रमातंर्गत स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त नवनाथ विद्यालयात झालेल्या व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम पार पडला.


या कार्यक्रमासाठी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, डॉ. विजय जाधव, माजी मुख्याध्यापक किसन वाबळे, प्रभारी मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, विशाल फलके, अनिल डोंगरे, नवनाथ हारदे, भरत बोडखे, ह.भ.प. राम जाधव, श्याम जाधव, विजय जाधव, तुकाराम खळदकर, संदीप डोंगरे आदी उपस्थित होते.
ड्रग्स मुक्त भारत हा संकल्प घेऊन शासनाच्या वतीने 12 ते 26 जून पर्यंत नशामुक्ती भारत पंधरवडा सुरु आहे. या पंधरवडानिमित्त विविध उपक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला जात आहे. अमली पदार्थाचे दुष्परिणामाबाबत व धोक्याविरुद्ध लढण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने सुरु असलेल्या पंधरवडा उपक्रमातंर्गत निमगाव वाघा (ता. नगर) येथे हा उपक्रम राबविण्यात आला.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, सक्षम भारताच्या निर्माणासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज बनली आहे. स्पर्धेच्या युगात युवक ताण-तणाव व निराशेमुळे व्यसनाच्या आहारी जात आहे. नशेच्या आहारी जाऊन युवा वर्ग आपले जीवन उध्वस्त करीत आहे. कमी वयातच व्यसनाधिन झालेले युवक दिसत असून, त्यांच्यामध्ये जागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांचे मार्गदर्शन लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *