• Sat. Jun 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहीद दिनानिमित्त लंगर सेवेची तारकपूरला मोफत चहा, नाष्ट्याची सेवा

ByMirror

Dec 27, 2022

शीख समाजाचे बलिदान व त्याग आजही समाजासाठी प्रेरणादायी -जनक आहुजा

अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरु गोविंद सिंहजी यांचे चार सुपुत्र बाबा अजित सिंहजी, बाबा जुझार सिंहजी, बाबा जोरावर सिंहजी व बाबा फतेह सिंहजी यांच्या शहिद दिनानिमित्त घर घर लंगर सेवेच्या वतीने तारकपूर येथील अन्न छत्रालयात नागरिकांसाठी एक सप्ताहासाठी सकाळी मोफत चहा, नाष्टाची सेवा सुरु करण्यात आली.


वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतेह…. जयघोषात या सेवेचे प्रारंभ करण्यात आले. या सेवेच्या माध्यमातून परिसरातील गरजू नागरिक, हॉस्पिटल मधील रुग्णांचे नातेवाईक यांना 31 डिसेंबर पर्यंत चहा व नाष्टाचे मोफत वितरण केले जात आहे.

यावेळी जनक आहुजा, राजेंद्र कंत्रोड, मनोज मदान, रामसिंग कथुरिया, सनी वधवा, करन धुप्पड, दलजितसिंह वधवा, राजू जग्गी, विवेक गुप्ता, जतीन आहुजा, करन चोपडा, संजय आहुजा, किशोर कंत्रोड, गुलशन कंत्रोड, राजा नारंग आदी उपस्थित होते.


जनक आहुजा म्हणाले की, धर्म व सत्यासाठी शीख समाजाने मोठे बलिदान दिले आहे. हे बलिदान व त्याग आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. कोरोना काळात शीख, पंजाबी समाजाने लंगरच्या माध्यमातून सेवा दिली, ती आजही सुरु आहे. दरवर्षी शहिदी दिन जिल्हा रुग्णालयात विविध प्रकारची सेवा देऊन सामाजिक उपक्रमाने साजरा केला जातो. यावर्षी लंगर सेवेच्या माध्यमातून सेवा देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *