• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

ख्रिसमसनिमित्त चर्चसाठी आलेल्या भाविकांमध्ये नेत्रदान व अवयवदानाची जनजागृती

ByMirror

Dec 25, 2022

फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- ख्रिसमसनिमित्त तारकपूर येथील सेंट सेव्हिअर्स कॅथेड्रल चर्चमध्ये फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नेत्रदान व अवयवदानाची जनजागृती करण्यात आली. यावेळी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आलेल्या भाविकांना नेत्रदान व अवयवदान संकल्प अर्जाचे वाटप करुन याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, आर.बी. मोकळे, दत्तात्रय नजन, सुरेंद्र साठे, रमेश इसलाल, प्रणिल काकडे, धर्मगुरु रेव्ह. सतीश तोरणे आदी उपस्थित होते.


चर्चमध्ये आलेल्या भाविकांना जालिंदर बोरुडे यांनी भाविकांनी मरणोत्तर नेत्रदान व अवयवदानची गरज व महत्त्व सांगितले. बोरुडे म्हणाले की, धार्मिकतेला सामाजिकतेची जोड दिल्यास परिवर्तन घडणार आहे. मरणोत्तर नेत्रदान काळाची गरज बनली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण होतो. भारतीय समाजात नेत्रदान व अवयवदानबद्दल गैरसमजुती व अंधश्रध्दा असून, त्या जनजागृतीने दूर होणार आहे. आज देशात अनेक अंध व्यक्ती डोळ्यासाठी प्रतिक्षेत आहे. डोळे कृत्रिमरित्या तयार होत नसून, मरणोत्तर नेत्रदान झाल्यानेच अंधाचे जीवन प्रकाशमान होणार आहे. प्रभू येशु ख्रिस्तांनी समाजातील गरजू व वंचितांसाठी आपले जीवन वेचले. त्यांच्या विचारांनी या चळवळीत मरणोत्तर नेत्रदान व अवयवदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. अनेक नागरिकांनी या अहवानाला प्रतिसाद देत नेत्रदान व अवयव दानाचे संकल्प अर्जही भरुन दिले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *