• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरात सैराटची पुनरावृत्ती होण्याच्या मार्गावर

ByMirror

Jan 25, 2023

प्रेम विवाह करणार्‍या युवकाला मुलीच्या भावांकडून जीवे मारण्याच्या धमक्या

त्या युवकाची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रेम विवाह करणार्‍या युवकाला मुलीचा भाऊ व त्यांच्या कुटुंबीयांकडून वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली जात असताना, त्या गुंड प्रवृत्तीच्या त्या व्यक्तींवर कारवाई करण्याची तक्रार गणेश मारुती कासार या युवकाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.


गणेश कासार यांनी काही वर्षांपूर्वी सर्जेपुरा गोकुळवाडी येथील एका मुलीशी प्रेम विवाह केला होता. दोन तीन वर्ष होऊन एक मुलगी झाली असताना देखील मुलीच्या घरच्यांचा या लग्नाला कायम विरोध राहिला आहे. हा विवाह मान्य नसल्याने तिचा भाऊ व कुटुंबातील सर्वच व्यक्तींनी गोकुळवाडी येथे राहण्यास मज्जाव केला होता. तर कुटुंबीयांना मारहाण देखील केली होती. सुरज गोंधळी, निशांत गोंधळी व वसंत गोंधळी यांच्यावर तोफखाना, एमआयडीसी व कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यांची सर्जेपुरा भागात मोठी दहशत असल्याचा आरोप गणेश कासार यांनी केला आहे.


सदर व्यक्तींच्या दहशतीमुळे जगणे अवघड झाले आहे. त्यांच्यामुळे सर्जेपुरा गोकुळवाडी भागात जाणे-येणे मुश्किल झाले आहे. गंजबाजारला कामावर असताना, त्यांनी मालकांना कामावर काढून टाकण्यासाठी धमकावले. त्यामुळे रोजगार देखील गेला आहे. संबंधीत व्यक्ती शस्त्र विक्रीचा व्यवसाय करत असून, त्यांच्या घराची तपासणी केल्यास मोठ्या प्रमाणात शस्त्र मिळणार आहे. त्यांच्यापासून मला व माझ्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका असल्याचे तक्रारदाराने निवेदनात म्हटले आहे.


गुंड प्रवृत्तीच्या या व्यक्तींना राजकीय पाठबळ असल्याने त्यांना पोलीस प्रशासन पाठीशी घालत आहे. संबंधितांवर गंभीर गुन्हे असताना त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्याची मागणी गणेश कासार यांनी केली आहे. अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *