• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

पारधी समाजाला मिळणारी गुन्हेगारीची वागणुक थांबवावी

ByMirror

Oct 20, 2022

रिपाई आदिवासी पारधी महिला आघाडीचे अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन

पारधी समाजाच्या विकासासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात याव्या -पार्वती भोसले

अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अंतर्गत आदिवासी पारधी महिला आघाडीच्या वतीने पारधी समाजाला मिळणारी गुन्हेगारीची वागणुक व इतर प्रलंबीत प्रश्‍नाबाबत अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांना निवेदन देण्यात आले.


जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे व आदिवासी पारधी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पार्वती भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जन आक्रोश मोर्चात या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी श्याम भोसले, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, नगरसेवक राहुल कांबळे, अविनाश भोसले, योगेश त्रिभुवन, राजेंद्र काळे, विवेक भिंगारदिवे, गौरव साळवे, आरती बडेकर, शशीकांत पाटील, संजय कांबळे, मंगल चव्हाण, सावकार भोसले, अश्‍विनी भोसले, देवा खरात आदींसह पारधी समाज बांधव महिला उपस्थित होत्या.


पारधी समाज रानावनात भटकत आहे. त्यांना शासनामार्फत स्वतंत्र घरकुल योजना राबवून घरकुले बांधून मिळावी. ज्या ठिकाणी पारधी समाजाच्या वसाहत आहे, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास पारधी समाज गुन्हेगार आहेत, की इतर गुन्हेगार हे समजणार आहे. निरापराध पारधी समाजातील युवकांना कोणत्याही गुन्ह्यात पोलीस उचलून नेत असून, हा प्रकार त्वरित थांबवावे. या समाजातील पुरुष जेलमध्ये गेल्यास महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो. पतीला सोडविण्यासाठी पत्नीला स्वतःला विकून किंवा मुलींना गहान ठेऊन त्याला सोडविण्यासाठी पैसे उभे करावे लागत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


पारधी समाजाला मालकी हक्काने कसण्यासाठी शासनाने प्रत्येकी पाच एकर जमीन द्यावी, अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात गुन्ह्याची सत्यता पडताळणी करुन विनाकारण पारधी समाजातील युवकांना गुन्हात ताब्यात घेऊ नये, आदिवासी पारधी समाजातील महिलांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी शासनाने आर्थिक मदत देऊन कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रिपाई आदिवासी पारधी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *