• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात शालेय मुलींची छेडछाड

ByMirror

Oct 11, 2022

ग्रामपंचायत सदस्याचे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

छेड काढणार्‍या टोळक्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील शालेय मुलींची शाळेबाहेर छेड काढणार्‍या टोळक्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


विद्यालया जवळ एक धार्मिक संस्था असून, त्या संस्थेचे मुले शाळेबाहेर जमून येणार्‍या जाणार्‍या विद्यार्थिनींची छेड काढत असल्याचा आरोप डोंगरे यांनी केला आहे. मुलींना रस्त्यात अडवून त्रास देण्याचा प्रकार सुरु असून, मुलींचे पालक बदनामी होण्याच्या भितीने तक्रार करण्यास पुढे येत नाही. त्यांची छेडछाडीची तक्रार करणार्‍यांना सदर धार्मिक संस्थेचे चालकाने धमकाविण्यास सुरुवात केली आहे. गावात त्यांच्या विरोधात तक्रार केल्याने त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे डोंगरे यांनी निवेदनात म्हंटले आहे. याप्रकरणी त्वरीत चौकशी करुन मुलींची छेड काढणार्‍या टोळक्यातील मुलांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *