• Mon. Jun 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

ByMirror

May 4, 2022

ग्रामपंचायत मधील कर्मचार्‍यांचा गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत मधील अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आला.


प्रारंभी नवनाथ विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, दिपक जाधव, भास्कर चारुडे, नवनाथ फलके यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच रुपाली जाधव, उपसरपंच अलका गायकवाड, माजी सरपंच साहेबराव बोडखे, विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन वाबळे, किरण जाधव, प्रमोद जाधव, अण्णा जाधव, गोरख चौरे, काशीनाथ पळसकर, दत्तात्रय जाधव, डॉ. विजय जाधव, अनिल डोंगरे, चंद्रकांत पवार, अतुल फलके, संदिप डोंगरे, अरुण काळे, निलकंठ वाघमारे, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, तुकाराम खळदकर, प्रतिभा डोंगरे, लहानू जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे यांनी ग्रामपंचायत मधील कामगार वर्गांला कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्मा झालेल्यांना आदरांजली वाहिली. श्रमिक कामगारांमुळे महाराष्ट्र व देशाची विकासात्मक वाटचाल सुरु असल्याचे सांगितले. यावेळी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *