• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

नागापूरच्या त्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व बुद्ध विहार उभारावा

ByMirror

Dec 15, 2022

रिपाई महिला आघाडीची आयुक्त व स्थायी समितीचे सभापतींकडे मागणी

या उपनगरात बाबासाहेबांचा एकही पुतळा व बुद्ध विहार नसल्याचे स्पष्टीकरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचा उपनगर भाग असलेल्या नागापूर येथील मनपाच्या मोकळ्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व बुद्ध विहार उभारण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे व मनपा स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांना देण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, संतोष पाडळे, विजय शिरसाठ, अनिकेत पवार, सोनाली पवार, शरद पाटोळे, सर्जेराव ठोंबरे, प्रथमेश पवार, अक्षय काळे, माया गायकवाड, राहुल गायकवाड, सोनाली भाकरे, आशा काते, सीमा काते, सुशीला भाकरे, अर्चना त्रिभुवन, इंदुबाई काते, लताबाई वडागळे, सविता पाटोळे आदी उपस्थित होते.


नागापूर उपनगरात राजवाडा येथे महानगरपालिकेचे एक जागा आहे. ही जागा सध्या वापरात नसून, अनेक वर्षापासून पड अवस्थेमध्ये आहे. संपूर्ण नागपूर भागामध्ये बौद्ध विहार नाही. त्याचप्रमाणे या परिसरामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा देखील नाही. त्यांची जयंती किंवा महापरिनिर्वाण दिनानिमित्त या भागातील नागरिकांना शहरातील मार्केटयार्ड येथील पुतळ्याच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी यावे लागत असल्याचे रिपाई महिला आघाडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


नागापूर भागात आंबेडकरी चळवळीतील जनसंख्या ही मोठी आहे. उपनगर हा झपाट्याने वाढला असून, या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा नसल्याने त्यांना वंदन करणे अडचणीचे होते. या ठिकाणी महापालिकेच्या जागेत बुद्ध विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारल्यास आंबेडकरी चळवळीतील नागरिकांची सोय होणार आहे. बुद्ध विहारच्या माध्यमातून इतर धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम घेता येणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

नागपूर राजवाडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच बुद्ध विहार उभारण्याची मागणी रिपाई महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *