• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

धोत्रे बुद्रुकला शेतात बेकायदा 13 झाडांची कत्तल

ByMirror

Oct 18, 2022

वृक्ष तोड करणार्‍यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे उपवनरक्षकांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतात बेकायदा 13 वृक्ष तोड करणार्‍यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करावी व वृक्ष तोडीचे लाकुड घेऊन जाणारी वाहने जप्त करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी वन विभागचे उपवनरक्षक यांच्याकडे केली आहे.


पारनेर तालुक्यातील मौजे धोत्रे बुद्रुक येथील गट नंबर 30/1 शेत जमीनीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पतीचे कोरोनाने निधन झाल्यानंतर, तक्रारदार महिला जयश्री रोकडे आपल्या माहेरी पाचेगाव (ता. नेवासा) येथे राहत आहे. त्यांच्या शेतजमिनीतील झाडे तोडण्यात आल्याचे समजल्यावर त्यांनी आपल्या मावस भाऊ बरोबर 11 ऑक्टोंबर रोजी शेतात येऊन पहाणी केली. यावेळी त्यांना शेतातील झाडे तोडण्यात आल्याचे आढळले.


वृक्ष तोड करण्यात आलेली झाडांची लाकडे एका ट्रॅक्टर मध्ये भरुन घेऊन जात असताना त्यांनी संबंधितांना विचारपूस केली. वृक्ष तोड करणारे संबंधित व इतर चार ते पाच लोकांनी त्यांना दमदाटी करून शिवीगाळ केल्याचा आरोप रोकडे यांनी केला आहे.


शेतातील लिंब, विलायती चिंच, गोडी बाबुळ, जांभूळ, करंजी, आंबा व कौठचे एकूण 13 झाडे तोडण्यात आली. याप्रकरणी वृक्षतोड करणार्‍यांवर वन विभागाच्या वतीने योग्य ती कारवाई करून, या प्रकरणात वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *