• Tue. Jun 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

कोजागिरी पौर्णिमेला निंबळकच्या कोटी लिंगेश्‍वर मंदिरात महाआरती

ByMirror

Oct 9, 2022

श्री हरिहर महाराज संस्थानचे संस्थापक ह.भ.प. डॉ. जालिंदर महाराज निकम यांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोजागिरी पौर्णिमेनिमित्त निंबळक (ता. नगर) येथील श्री हरिहर महाराज संस्थानचे कोटी लिंगेश्‍वर मंदिरात रविवारी सकाळी महाआरती करण्यात आली. यावेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.


भाविकांसाठी विविध धार्मिक उपक्रम राबवित असल्याबद्दल श्री हरिहर महाराज संस्थेचे संस्थापक ह.भ.प. डॉ. जालिंदर महाराज निकम यांचा सामाजिक कार्यकर्ते तथा जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग यांनी सत्कार केला. यावेळी उपसरपंच बाळासाहेब कोतकर, माजी तहसिलदार रोहिदास महाराज जाधव, इसळकचे सरपंच छाया गेरंगे, ह.भ.प. नाना गव्हाणे, छबू जगताप, लक्ष्मण दारुंटे, मठाचे सेवेकरी रामचंद्र निर्मल, बाळासाहेब कोतकर, केशव गेरंगे, चंकाबाई खामकर, घनश्याम म्हस्के आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दुपारी अहिल्याबाई वसंतराव बोग्गा यांच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री हरिहर महाराज संस्थानमध्ये श्रीमद् भागवत संगीत कथा व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून, ह.भ.प. मंगेश महाराज वाघ (नेवासा) यांचा कथेचा कार्यक्रम रंगत आहे. या कथा सोहळ्यात भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, दि.12 ऑक्टोबरला ह.भ.प. मच्छिंद्रनाथ महाराज राऊत (पिंपळा) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *