• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

विविध क्षेत्रात सामाजिक योगदान देणार्‍या व्यक्तींचा स्वराज्य भूषण पुरस्काराने होणार सन्मान

ByMirror

May 11, 2023

पुरस्कारसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

छत्रपती संभाजी महाराज व अहिल्यादेवी होळकर जयंतीचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज व अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणार्‍या व्यक्तींचा स्वराज्य भूषण पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे व युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे यांनी केले आहे.


संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज व अहिल्यादेवी होळकर यांची संयुक्तपणे जयंती निमगाव वाघा (ता. नगर) येथे साजरी केली जात आहे. जयंती उत्सवानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, धार्मिक, वैद्यकिय व पर्यावरण संवर्धनावर उत्कृष्ट कार्य करणार्‍या व्यक्तींना सदर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.


पुरस्काराचे प्रस्ताव 17 मे पर्यंत संस्थेचे कार्यालय स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, अध्यक्ष पै. नाना डोंगरे, निमगाव वाघा ता. जि. अहमदनगर 414005 या पत्त्यावर पाठवावे व अधिक माहितीसाठी 9226735346, 8605775261 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *