• Fri. Oct 9th, 2026

Mirrornews24

Marathi News

विजय भालसिंग यांचा गोवा सोशल एक्सलन्स अवॉर्डने गौरव

ByMirror

Oct 9, 2026

‘गोवा सोशल एक्सलन्स अँड इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये सामाजिक कार्याचा सन्मान


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक तसेच निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात गेल्या दोन दशकांपासून निस्वार्थपणे कार्य करणारे वाळकी (ता. अहिल्यानगर) येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना स्वर कला संघ, गोवा आणि समाज कल्याण संचालनालय, गोवा सरकार यांच्या वतीने ‘गोवा सोशल एक्सलन्स अवॉर्ड 2026’ ने गौरविण्यात आले. त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक व पर्यावरणपूरक कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.


पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘गोवा सोशल एक्सलन्स अँड इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये मान्यवरांच्या हस्ते भालसिंग यांचा गौरव करण्यात आला. ‘सेवेपासून सामाजिक परिवर्तनापर्यंत’ हे ब्रीदवाक्य घेऊन या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक दिशा देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला. या कार्यक्रमास आमदार तथा गोव्याचे माजी कला, क्रीडा व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, आमदार प्रेमेंद शेटे तसेच अभिनेत्री श्रुती पारकर, संस्थेचे अध्यक्ष निहाल सावंत, स्वागताध्यक्ष प्रा.डॉ. बी.एन. खरात उपस्थित होते.


विजय भालसिंग हे गेल्या दोन दशकांपासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे योगदान देत आहेत. वाळकी येथील रहिवासी असलेले भालसिंग एसटी बँकेची नोकरी सांभाळत सामाजिक कार्यासाठी वेळ देत आहेत. ते अनेक सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम स्वखर्चातून राबवत आहेत. वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्यावरही त्यांचा विशेष भर असतो. वाढत्या शहरीकरणामुळे आणि सिमेंटच्या जंगलामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असताना पशु-पक्ष्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, पशु-पक्ष्यांप्रती असलेली संवेदनशीलता आणि ग्रामीण भागातील प्रश्‍नांसाठी केलेले कार्य याची दखल घेत विजय भालसिंग यांची ‘गोवा सोशल एक्सलन्स अवॉर्ड 2026’ प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *