• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

रिपाईच्या वतीने भिंगार येथील निराधार ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचे वाटप

ByMirror

Dec 25, 2022

रिपाईचा सामाजिक भावनेने वंचित दुर्बल घटकांना आधार -अमित काळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने निराधार ज्येष्ठ नागरिकांना थंडीनिमित्त ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.


भिंगार येथील रोकडेश्‍वर मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ नागरिकांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शशिकांत पाटील, आयटी सेल जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मोकळ, युवक जिल्हा सरचिटणीस दया गजभिये, युवक जिल्हा सचिव गौतम कांबळे, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रविण वाघमारे, युवक जिल्हा उपाध्यक्ष महादेव भिंगारदिवे, युवक तालुका सरचिटणीस निखिल सुर्यवंशी, युवक तालुका उपाध्यक्ष अजय पाखरे, भिंगार शहराध्यक्ष आकाश तांबे, युवक अध्यक्ष महेश भिंगारदिवे, आयटी सेल भिंगार शहराध्यक्ष विक्रम चौहान, युवराज पाखरे, मच्छिंद्र भिंगारदिवे, पांडूरंग भिंगारदिवे, हेमंत खरे, राहुल विघावे आदी उपस्थित होते.


युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे म्हणाले की, रिपाईच्या माध्यमातून सामाजिक भावनेने वंचित दुर्बल घटकांना आधार दिला जात आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने कार्य सुरु आहे. दुर्लक्षित समाजाला न्याय व सन्मान मिळण्यासाठी ना. आठवले यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. आरपीआयमध्ये प्रत्येक कार्यकर्ता सामाजिक योगदान देत असून, पक्षाचे कार्य एका समाजापुरते मर्यादित नसून सर्वसमावेशक आहे.


अजय साळवे म्हणाले की, रिपाईमध्ये जिल्ह्यात युवकांची एक सक्षम फळी उभी राहिली आहे. आंबेडकरी चळवळीला बळ मिळण्यासाठी एक झेंडा एक पक्षाखाली सर्व बहुजन समाजाला एकत्र आणण्याचे काम केले जात आहे. युवा शक्तीच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *