• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

भूकेलेल्यांना जेवण पुरविणाऱ्या लंगर सेवेच्या सेवादारांचा गौरव

ByMirror

Aug 6, 2023

तीन वर्ष लंगर सेवा व मागील एक वर्षापासून अन्न छत्रालय अविरतपणे सुरु

लंगरची माणुसकीची सेवा शहराच्या दृष्टीने अभिमानास्पद -धनेश बोगावत

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरात सुरु झालेल्या व तब्बल तीन वर्ष भूकेलेल्यांना जेवण पुरविणाऱ्या आणि घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयाच्या वर्ष पूर्ती झाल्याबद्दल धनेश बोगावत परिवाराच्या वतीने लंगर सेवेच्या सेवादारांचा गौरव करण्यात आला.


शहरातील स्विट होम मध्ये झालेल्या सेवादारांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी लंगर सेवेचे जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, प्रशांत मुनोत, अनिश आहुजा, गुलशन कंत्रोड, मनोज मदान, राजू जग्गी, कैलाश नवलानी, दलजितसिंह वधवा, सोमनाथ चिंतामणी आदी उपस्थित होते.


धनेश बोगावत म्हणाले की, घर घर लंगर सेवेच्या वतीने कोरोनाच्या टाळेबंदीपासून शहरातील लाखो गरजू घटकांना दोन वेळचे अन्न देऊन त्यांची भूक भागविण्यात आली. लंगर सेवेच्या अन्न छत्रालयात अवघ्या 10 रुपयात एका व्यक्तीला पोटभर जेवणाचे फुड पॅकेट दिले जात आहेत. मागील चार वर्षापासून शहरात लंगरची सेवा अवितरत सुरु आहे. यामधील सेवादार आपला व्यवसाय, उद्योगधंदे सांभाळून स्वतः किचनमध्ये कार्यरत राहून सेवा देत आहेत. सामाजिक भावनेने सुरु असलेली सेवा कौतुकास्पद आहे. या सेवा कार्याची परदेशात देखील दखल घेण्यात आली असून, ही माणुसकीची सेवा शहराच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.


जनक आहुजा म्हणाले की, नगरकरांनी दिलेल्या सहयोगामुळे ही सेवा अविरतपणे सुरु आहे. यामध्ये अनेकांचे हातभार लागत आहे. लंगर सेवेचा लाभ गरजू घटकांना मिळण्यासाठी ही सेवा देणगीदारांच्या सहकार्याने अविरतपणे सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


हरजितसिंह वधवा म्हणाले की, कोणीही उपाशी पोटी झोपू नये, हाच एकमेव उद्देश ठेऊन लंगर सेवा केली जात आहे. या सेवा कार्यात बोगावत परिवाराचे देखील मोठे योगदान राहिले आहे. घरातील शुभ कार्यात बोगावत कुटुंबीयांनी लंगर सेवेला मदत दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *