• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

बाराबाभळी मदरेसच्या मैदानावर 16 व 17 डिसेंबरला होणार जिल्हास्तरीय इज्तेमा

ByMirror

Nov 26, 2022

पोलीस प्रशासनाकडून पहाणी

एक ते दीड लाख मुस्लिम समाज बांधवांची राहणार हजेरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया मोहम्मदिया मदरसाच्या मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय इज्तेमाची जय्यत तयारी सुरु आहे. 16 व 17 डिसेंबर या दोन दिवसीय इज्तेमात बाराबाभळी मदरसेच्या 65 एकर मैदानावर एक ते दीड लाख मुस्लिम समाज बांधव उपस्थित राहणार आहे. या दृष्टीने तयारी सुरु करण्यात आलेली आहे.


या इज्तेमाच्या तयारीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, बंदोबस्ताच्या दृष्टीकोनाने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी मदरसा परिसराची पहाणी केली. यावेळी जिम्मेदार अब्दुस सलाम, मदरसेचे विश्‍वस्त कारी अब्दुल कादिर, हाजी मन्सूर शेख, हाजी शौकत तांबोली, रऊफ टायरवाले, शाकीर शेख आदींसह इज्तेमाचे समन्वयक उपस्थित होते.


सहा. पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी सुरु असलेल्या तयारी व प्रत्यक्ष मैदानाची पहाणी केली. पार्किंग, थांबण्याची व्यवस्था व बंदोबस्ताबाबत आयोजकांशी चर्चा करुन सूचना केल्या. इज्तेमासाठी 8 जेसेबीसह मैदानाची स्वच्छता मागील दहा दिवासापासून सुरु होती. दररोज दोनशे ते तीनशे युवक इज्तेमाच्या तयारीसाठी हजर राहून श्रमदान व विविध प्रकारचे सहकार्य (खिदमत) करत आहे. या परिसराची पूर्णत: स्वच्छता करण्यात आली आहे.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात इज्तेमा होत असल्याने त्याची तयारी देखील तेवढीच जय्यत सुरु आहे. 16 डिसेंबरला शुक्रवारी शुक्रवारच्या सकाळच्या नमाज व बयाननंतर मोठ्या उत्साहात प्रारंभ होणार आहे. सत्याच्या मार्गावर चालावे, कोणालाही दुखवू नये. तसेच देशातील एकात्मता अखंडित राहो, आपसात भाईचारा निर्माण होवो, अहंकार, घमंड, श्रीमंत-गरीब यातील भेद दूर व्हावे, माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आदी ईस्लाम धर्माच्या तत्वाची शिकवण व विचारांचा संदेश या इज्तेमातून दिला जाणार आहे. या इज्तेमासाठी दिल्ली येथून मौलाना व बाराबाभळी मदरसेचे संस्थापक संचालक हाजी गुलाम मुस्तफा उपस्थित राहणार आहे. यावेळी मदरसेतील 35 हाफिज झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील करण्यात येणार आहे. शनिवारी 17 डिसेंबरला संध्याकाळी विश्‍वाशांती व भाईचारासाठी सामुहिक दुवाने या इज्तेमाचा समारोप होणार आहे.

बाराबाभळी मदरसाच्या 65 एकर जमीनीवर इज्तेमाची जय्यत तयारी

या धार्मिक कार्यक्रमात 20 एकर मध्ये मुख्य मंडप राहणार असून, त्यामध्ये इज्तेमाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर 20 एकर जागेत प्रशस्त पार्किंगची सुविधा केली जाणार आहे. 10 एकर जमीनीवर विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात येणार आहे. तर स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली असून, स्वच्छतागृह व स्वयंसेवक स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेणार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *