• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

बसपाचा सामाजिक उपक्रमांनी जनकल्याणकारी दिवस साजरा

ByMirror

Jan 16, 2023

जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप

बसपा जातीयवाद व धर्मांधतेविरोधात -काळूराम चौधरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या बहन मायावतीजी यांचा वाढदिवस जनकल्याणकारी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. बहुजन समाज पार्टीच्या वतीने शहरात व जिल्ह्याच्या विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.


शहरात पदाधिकार्‍यांची बैठक होऊन अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रदेश सचिव काळूराम चौधरी, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुनील ओहळ, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, शहराध्यक्ष संतोष जाधव, विधानसभा प्रभारी संजय डहाणे, शहर सचिव राजू गुजर, सुनील मगर, जाकीर शहा, सलिम अत्तार, प्रकाश अहिरे, विजय मटाले, गणेश बागल, मारुती विधाटे, रामशंकर यादव, सोहन सिंग आदी उपस्थित होते.


जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव म्हणाले की, जिल्ह्यात बसपाचे संघटन मजबूत होत असून, येत्या निवडणुकीत आपले असतित्व दाखवून देणार असल्याचे सांगितले. प्रदेश कार्यकारणी सदस्य सुनील ओहळ यांनी पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता पक्षाच्या विचारधारेने व बहुजन समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्य करीत आहे. बहुजन समाज पार्टी ही जनकल्याणकारी पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

शहराध्यक्ष संतोष जाधव म्हणाले की, सर्व कार्यकर्त्यांनी पुढील निवडणुकीला सामोरे जाताना सामाजिक योगदान दिल्यास बहुजन समाज पक्षाला जोडला जाणार आहे. पक्षात सर्व सामान्य बहुजन समाजाला केंद्रबिंदू मानून पक्षाची वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रदेश सचिव काळूराम चौधरी म्हणाले की, पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या बहन मायावतीजीच्या नेतृत्वाखाली पक्ष वाटचाल करीत असताना सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य केले जात आहे. बसपा जातीयवाद व धर्मांधतेविरोधात असून, लोकशाही मार्गाने सर्व बहुजन समाजाला एकत्र घेऊन योगदान देत आहे. युवक मोठ्या संख्येने पक्षाला जोडले जात असून, राजकारणापेक्षा समाजसेवा हे ध्येय ठेऊन कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *