• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

संक्रांतीला तिळगुळ वाटप करुन राष्ट्रीय योग कर्तव्य जारी

ByMirror

Jan 15, 2023

धनदांडगे वोट माफियांविरोधात मतदारांना डिच्चू कावा करण्याचे आवाहन

राजकारणातून पैसा व पैश्यातून सत्ता हा एक धंदा -अ‍ॅड. कारभारी गवळी

अहमदनगर (प्रतिनिधी)- मकर संक्रांतीनिमित्त पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेच्या वतीने तिळगुळ वाटप करुन राष्ट्रीय योग कर्तव्य जारी करण्यात आला. हुतात्मा स्मारक येथे चौथे शिवाजी महाराजांच्या समाधीस अभिवादन करुन लोककल्याणकारी प्रशासक आणण्यासाठी चांगले उमेदवारांना निवडून देण्याचे व धनदांडगे वोट माफियांविरोधात डिच्चू कावा करण्याचे आवाहन करण्यात आले.


या मतदार जागृती अभियानाच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या अभियानाप्रसंगी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, पोपट भोसले, कारभारी वाजे, नंदा साबळे, बळीराम पाटोळे, दीपक गोसावी आदी उपस्थित होते.


संबळ, हलगीच्या निनादात जय शिवाजी, जय डिच्चू कावाच्या घोषणा देण्यात आल्या. मतदारांना पैसे, दारु आदी आमिष अथवा जाती, धर्माच्या नावाने मागच्या दाराने सत्ता मिळवतात. मिळवलेल्या सत्तेतून जनतेच्या तिजोरीवर डल्ला मारतात व सर्वसामान्यांची कामे न करता सत्तेतून स्वत:चे हित साधतात. अशा राजकारणी लोकांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी राष्ट्रीय योग कर्तव्य म्हणून डिच्चू कावा जारी करण्यात आले असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


अ‍ॅड. कारभारी गवळी म्हणाले की, वोट माफीया आजपर्यंत पैसे, कोंबडी, दारू व जातीच्या नावाने मतदान घेऊन सत्तेवर आले आहेत. राजकारणातून पैसा व पैश्यातून सत्ता हा एक धंदा त्यांनी सुरू केला आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्‍नाविषयी त्यांना आस्था राहिलेली नाही. अनेक प्रश्‍न गंभीर होत चाललेले आहेत. देशात स्वातंत्र मिळून लोकशाही असतित्वात आली. मात्र लोकशाही मत विक्रेत्यांनी गहाण ठेवली. पैसे घेऊन मत देणार्‍यांमुळे स्वत:चे हित साधणारे सत्तेवर येतात. अशा लोकांना धडा शिकविण्यासाठी व चांगले उमेदवार निवडून देण्याकरिता हे अभियान असल्याचे त्यांनी सांगितले.


अशोक सब्बन म्हणाले की, लोकशाही प्रगल्भतेसाठी मतदारांमध्ये जागृती आवश्यक आहे. चांगले उमेदवार निवडून देण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहे. राजकारणी पक्षांतर स्वतःच्या हितासाठी व स्वार्थासाठी करत आहे. त्यांना नागरिकांच्या प्रश्‍नांविषयी आपुलकी नसून, मतदारांनी देखील जागृक होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *