• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना दिल्या ईद व अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

ByMirror

Apr 22, 2023

गावात धार्मिक एकतेचे दर्शन

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे रमजान ईद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील मशिदमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी सामुदायिक नमाज पठण करुन, गावाच्या सुख, समृध्दी व शांततेसाठी प्रार्थना केली. नमाजनंतर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी हिंदू बांधव मशिदमध्ये आर्वजून उपस्थित होते. एकमेकांना अलींगण देत ईदच्या शुभेच्छा तर मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या. यातून गावातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले.


गावाच्या मशिदमध्ये मौलाना इलियास यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करण्यात आली. यावेळी हाजी चांद शेख, पै. कादर शेख, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, माजी सरपंच साहेबराव बोडखे,  भागचंद जाधव, जयराम जाधव, माजी उपसरपंच बबन जाधव, उस्मान शेख, जावेद शेख, पापाभाई शेख, रज्जाक शेख, दिलावर शेख, राजू शेख, आदम शेख, अहमद सय्यद, बख्तार सय्यद, बन्सी शेख, नवाब शेख, सलिम शेख, शब्बीर शेख, नासिर शेख, मोसीम शेख, आबिद शेख, नवाझ सय्यद, पोलीस नाईक राहुल शिंदे, मन्सूर शेख, पै. संदिप डोंगरे आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन शिरखुर्माचा आस्वाद घेऊन कुटुंबीयांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *