• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

त्या पोलीस अधिकारी विरोधात गुरुवारी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे उपोषण

ByMirror

Feb 19, 2023

अर्थपूर्ण संबंधासाठी पिडीत तक्रारदारांना धमकावून मारहाण केली जात असल्याचा आरोप

त्या पोलीसांचे ड्युटी रजिस्टर नक्कल व ड्युटी बटवडा तक्त्याची तपासणी करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील पोलीस अधिकारी व त्याचे काही पोलीस कर्मचारी पिडीत तक्रारदारांवर कुठल्याही प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद नसताना रात्री-अपरात्री त्यांच्या घरी जावून मारहाण करणे, त्यांना उचलून पोलीस स्टेशनला आणने व अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी धमकाविण्याचे प्रकार करत असल्याची वेळोवेळी तक्रार करुन देखील संबंधितांवर कारवाई होत नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर गुरुवारी (दि.23 फेब्रुवारी) आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.


पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या काही सहकारी कर्मचार्‍यांनी कुठलाही गुन्हा नोंद नसताना माजी सैनिक प्रशांत ठुबे (रा. बाबुर्डी), बबन बर्डे (रा. वनकुटे) व समशुद्दीन सय्यद (रा. पोखरी) यांना जाणीवपूर्वक अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी मनमानी पद्धतीने मारहाण करून पोलीस स्टेशनला आणले. याबाबत पत्र व्यवहार करून संबंधितांवर कुठलीही कार्यवाही पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आलेली नाही. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत संबंधित पोलीस निरीक्षकाची बदली मुख्यालयात करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.


तक्रारदाराच्या निहाय पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी यांची ड्युटी बटवाडा व रजिस्टर नक्कल, त्यांचे मोबाईल लोकेशन व मोबाईलची सीडीआर तक्रारीनुसार तपासणी करण्याची मागणीचे निवेदन संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे. तर तक्रार करत असल्याने संबंधित पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी तक्रारदारांवर दबाव आणत असून, जाणिवपूर्वक गुन्ह्यात अडकविण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हंटले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *